Breaking

Saturday, 25 December 2021

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी /सतिश निंबाळकर - सोलापूरकरांनो इकडे लक्ष द्या, अन्न व औषध प्रशासनाचे नवे आदेश, खाद्यपदार्थाबाबत घेतला हा निर्णय.


सोलापूरकरांनो इकडे लक्ष द्या....अन्न व औषध प्रशासनाचे नवे आदेश, खाद्यपदार्थाबाबत घेतला हा निर्णय- याबाबत वृत्त असे की दुकानात हॉटेलमध्ये रस्त्यावरील गाड्यावर खाद्यपदार्थ खायला देण्यासाठी किंवा बांधून देण्यासाठी वर्तमानपत्राचा सर्रास वापर होताना दिसून येतो मात्र अन्नपदार्थ पॅक करण्यासाठी वर्तमानपत्र वापरता येणार नाही कारण वर्तमानपत्र प्रिंट करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या शाईत केमिकल असते आणि ते केमिकल धोकादायक असल्याचे समोर आले आहे, त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासनाने याबाबत नवीन आदेश काढले आहेत त्यामुळे आता असे पदार्थ बांधण्यासाठी वर्तमानपत्र वापरण्याची सोडून द्यावे लागणार आहे, 

डायआयब्युटाइल फटालेट आणी डायइन आयसोब्युटाईल या केमिकलचा वापर वृत्तपत्र छपाईसाठी केला जातो, हे आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असतात म्हणूनच पदार्थांमधील अतिरिक्त तेल शोषून घेण्यासाठी टिश्यू पेपर किंवा पेपर टाॅवेलचा वापर करणे सुचवली जाते ही शाई  पोटात गेल्यास पचनक्रियेत बिघाड होऊ शकतो या केमिकल मुळे अनेक पोटाचे विकार ही जडू शकतात, आता अन्न आणि औषध प्रशासन विभागाने नवे आदेश काढले आहेत त्यामध्ये त्यांनी खाद्यपदार्थ वर्तमानपत्रात बांधून देण्यास मनाई केली आहे.

हॉटेल चालकांनी दुकानदारांनी याचे पालन न केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाऊ शकते आपल्याकडे पोहे वडे भजी यासारखे अनेक गरम पदार्थ सर्रासपणे वर्तमानपत्रात बांधून दिले जातात मात्र त्यातील केमिकल आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते याबाबतची धोक्याची सूचना फुड सेफ्टी & स्टॅंडर्ड अॅथोरिटी ऑफ इंडिया यांनीही आधीच दिली आहे, त्यामुळे या नियमाचे काटेकोर पालन करण्याचे आदेश अन्न आणि औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त श्री प्रदीप कुमार राऊत यांनी दिले आहेत.

No comments:

Post a Comment