Breaking

Wednesday, 8 December 2021

विशेष प्रतिनिधी/ महादेव गाडे - सोलापूरचे विद्यमान उपमहापौर आणी भाजपा नगरसेवक राजेश काळे तडीपार.


*सोलापूरचे विद्यमान उपमहापौर आणि भाजप नगरसेवक राजेश काळे यांना तडीपार करण्यात आलं आहे.*

सोलापूर - सोलापूरचे विद्यमान उपमहापौर आणि भाजप नगरसेवक राजेश काळे (Rajesh Kale) यांना तडीपार करण्यात आलं आहे. दोन वर्षांसाठी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी याबाबत माहिती दिली नाही. मात्र उपमहापौर राजेश काळे यांनीच आपल्यावर तडीपारीची कारवाई झाल्याचं सांगितलं आहे.
उपमहापौर राजेश काळे यांना सोलापूर आणि उस्मानाबादमधून (Usmanabad) त्यांना तडीपार करण्यात आले आहे. त्यांना सकाळीच पोलिस आयुक्तांकडून आदेश मिळाले आहेत. ते सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातून बाहेर पडले आहेत. शिविगाळसह विविध गुन्हे त्यांच्यावर होते. फसवणुकीसह अनेक आरोप त्यांच्यावर होते.
हेही वाचा: 'मी भाजपात प्रवेश केला नाही म्हणून मला तुरुंगात टाकलं'
राजेश काळे यांना उपायुक्त धनराज पांडे (Dhanraj Pandey) यांना शिविगाळप्रकरणी अटकही झाली होती. त्यांच्यावर ७ गुन्हे दाखल आहेत. राजेश काळे यांनी सांगितलं की, निवडणुका तोंडावर असून राजकीय द्वेषातून ही कारवाई केली आहे. तडीपारीच्या आदेशाविरोधात न्यायालयात मी दाद मागणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
सोलापूरच्या उपायुक्त वैशाली कडूकर (Vaishali Kadukar) म्हणाल्या, उपमहापौर राजेश काळे यांच्यावर सात गुन्हे दाखल होते. त्यांना सोलापूर उस्मानाबाद इंदापूर येथून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले तर सेटलमेंट भागातील रहिवासी चेतन नागेश गायकवाड (Chetan Nagesh Gaikwad) यांनाही दोन वर्षासाठी सोलापूर उस्मानाबाद इंदापूर येथून तडीपार करण्यात आला आहे त्यांच्यावर खून खुनाचे प्रयत्न असे दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत.

No comments:

Post a Comment