Breaking

Friday, 26 November 2021

मोहोळ तालुका प्रतिनिधी /संभाजी वागज - शेटफळ येथील राष्ट्रीय महामार्गा लगतच्या सर्व्हिस रस्त्याचे काम सुरू न केल्यास जनआंदोलनाचा इशारा.


शेटफळ येथे राष्ट्रीय महामार्ग लगतचा सर्व्हिस रस्ता नाही चालू केल्यास जनआंदोलनाचा इशारा !
मोहोळ तालुक्यातील शेटफळ हे गाव सिदोबाचे गाव म्हणून जिल्ह्यात प्रसिद्ध मात्र हेच देवाचे गाव आज काही लोकांच्या स्वार्थामुळे मृत्यूचे ठिकाण बनलेले आहे. याच गावातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ सोलापूर -पुणे जोडणारा मार्ग जातो. या महामार्गाच्या दोन्ही म्हणजे दक्षिण आणि उत्तर बाजूला गाव वसलेले असून दक्षिणेकडील बाजूला जिल्हा उपरुग्णालय व दाट लोकवस्ती आहे. दोन्ही बाजूनी लहान मुलांची व लोकांची आवक-जावक शाळा, दवाखाना व इतर गरजा भागविण्यासाठी होत असते. याच महामार्गावरून माढा या तालुक्यासाठी जाणाऱ्या लोकांची रहदारी असते . रस्त्याच्या एका म्हणजे दक्षिणेकडील बाजूचा सर्व्हिस रस्ता पूर्ण झालेला आहे परंतु पूल अथवा बोगदा नसल्याने या सर्व्हिस रस्त्याचा असूनही काही उपयोग नाही तर गावाकडील बाजूचा सर्व्हिस रस्ता काही स्वार्थी राजकीय लोकांनी रस्ताहद्दीत झाडे लावून पैसे मिळवन्याच्या उद्देशाने अडवणूक केलेली आहे. सदर सर्व्हिस रस्त्याचे काम चालू झाले होते मात्र  पैसे मिळावेत म्हणून संपूर्ण गावास वेठीस धरले जाते ही गोष्ट निंदनीय आहे. आतापर्यंत हा सर्व्हीस रस्ता नसल्याने जवळ जवळ 13 लोकांनी आपले प्राण गमावले आहेत तर 25 जण जखमी झालेले आहेत. महामार्गाच्या दक्षिणेकडील बाजूला स्मशानभूमी असून कोणाचे मयत झाल्यास ते प्रेतसुद्धा स्वतःचा जीव मुठीत धरूनच न्यावे लागते. यासंदर्भात महामार्ग प्रकल्प संचालक श्री संजय कदम यांना संपर्क करण्याचा प्रयत्न गावकऱ्यांनी केला मात्र त्यांचा भ्रमणध्वनी गेली कित्येक दिवस झाले बंदच असल्याने त्यांच्या कार्यालयात जाऊन प्रा. श्री. पी. बी. भांगे, श्री. शिवाजी वागज, डॉ शशिकांत वागज, श्री सुनील खडके, सुखानंद भांगे, बालाजी माळी, नितीन कसबे व इतरांनी सदर सर्व्हिस रस्त्याचे काम त्वरित चालू करावे व लोकहानी थांबवावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल असे लेखी निवेदन सादर केले.

No comments:

Post a Comment