वेणेगाव च्या कर्तव्यदक्ष ग्रामसेविका शकुंतला शंकर माने (पवार )यांचा अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित १४ वे अखिल भारतीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन सोलापूर यांच्या वतीने',महात्मा फुले जिल्हास्तरीय समाजरत्न पुरस्काराने संमेलनाध्यक्ष डॉक्टर सौ स्मिता मेहेत्रे, चित्रपट दिग्दर्शक शरद गोरे, सुप्रसिद्ध सिनेअभिनेत्री दिपाली भोसले- सय्यद ,शुभांगी ताई काळभोर यांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले.
वेणेगाव, तांबवे ,अकोले, शेवरे या विविध गावच्या ग्रामपंचायत मध्ये विविध प्रकारच्या शासकीय योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवून गावाचा विकास करण्यासाठी त्यांनी उत्तम प्रकारचे काम केलेले आहे .अवघे गाव म्हणजे माझे घर ,कुटुंब या तत्त्वाप्रमाणे मनापासून काम केल्याने गावाचा सर्वांगीण विकास तर झालाच पण यामुळे गावाला विविध प्रकारचे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत.
मला मिळालेला पुरस्कार हा माझ्या कुटुंबाच्या आणि गावाच्या सहकार्यामुळे मिळालेला आहे आणि या पुरस्कारामुळे आणखी नवीन ऊर्जा ,प्रेरणा मला मिळालेले आहे .यामुळे आणखीन जोमाने मी काम करणार आहे.पण यामुळे आणखी मोठी जबाबदारी वाढलेली आहे असे मत पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांनी काढले.
हा पुरस्कार मिळाल्यामुळे पंचायत समिती कुर्डूवाडी चे गट विकास अधिकारी संताजी पाटील, विस्तार अधिकारी भारत रेपाळ, सर्व ग्रामसेवक बंधू-भगिनी, वेने गावचे सरपंच ,उपसरपंच ,सदस्य ,ग्रामस्थ यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.


No comments:
Post a Comment