Breaking

Friday, 26 November 2021

मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमिर आतार - सिंहगडची प्लेसमेंट मध्ये उत्तुंग झेप.


*पंढरपूर सिंहगडची प्लेसमेंट मध्ये उत्तुंग झेप*

*प्लेसमेंट मध्ये पंढरपूर सिंहगडची यशस्वी वाटचाल*

*○ ५१ विद्यार्थ्यांची "काॅग्निझंट" कंपनीत मुलाखतीतून निवड: प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांची माहिती*

अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रात सध्या पंढरपूर सिंहगड महाविद्यालय प्लेसमेंट मध्ये सर्वाधिक पुढे असुन जगातील नामांकित कंपन्या ह्या पंढरपूर सिंहगड महाविद्यालयात येत आहेत. यावर्षी पंढरपूर सिंहगड महाविद्यालयातील तब्बल ५१ विद्यार्थ्यांची जगातील नामवंत असलेली "काॅग्निझंट" या कंपनीत कॅम्पस मुलाखतीतून निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
    पंढरपूर सिंहगड महाविद्यालयाचा प्लेसमेंटचा आलेख प्रत्येक वर्षी वाढत असून या वर्षी देखील पंढरपूर सिंहगडने प्लेसमेंट मध्ये उत्तुंग झेप घेतली आहे. महाविद्यालयाचा प्रत्येक वर्षी शैक्षणिक क्षेत्रातील आलेख हा दिवसेंदिवस उंचावत चालला आहे. हे सर्व घडत असताना विद्यार्थी केंद्रबिंदू मानुन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सिंहगड महाविद्यालयाचा अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रातील दैदीप्यमान वाटचाल यशस्वी ठरली आहे.
   "काॅग्निझंट" कंपनीत महाविद्यालयातील सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील सहा, काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागातील १४, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागातील तीन, इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग विभागातील आठ आणि  मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील १९ अशा तब्बल ५१ विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखतीतून निवड झाली असुन "काॅग्निझंट" कंपनीकडून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक ४ लाख ते ५.५० लाख पॅकेज मिळणार आहे. त्यांच्या या निवडीबद्दल पालक वर्गातून आनंद व्यक्त होत आहे.
   "काॅग्निझंट" कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, डॉ. श्याम कुलकर्णी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. अल्ताफ मुलाणी, डाॅ. संपत देशमुख, डॉ. श्रीगणेश कदम, डॉ. चेतन पिसे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. समीर कटेकर, प्रा. अभिजित सवासे, प्रा. योगिनाथ कलशेट्टी, प्रा. प्रसाद कुलकर्णी, प्रा. ऋषिकेश देशपांडे आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment