Breaking

Saturday, 18 September 2021

माढा तालुका प्रतिनिधी/ मदन मुंगळे - बहुजन सत्यशोधक संघाच्या माढा तालुका युवक अध्यक्षपदी सुरेश वाघमारे.


बहुजन सत्यशोधक संघ माडा तालुका युवक अध्यक्षपदी सुरेश वाघमारे

बहुजन सत्यशोधक संघ या सामाजिक संघटनेच्या माडा तालुका युवक अध्यक्षपदी सुरेश वाघमारे यांची निवड राष्ट्रीय अध्यक्ष मा सुनील ओहोळ यांच्या आदेशाने जिल्हा उपाध्यक्ष नितीन वाघमारे यांनी केली, यावेळेस नूतन तालुका युवक अध्यक्ष सुरेश वाघमारे हे बोलताना म्हणाले की एससी एसटी वर खूप मोठ्या प्रमाणावर अन्याय-अत्याचार होत आहे त्यांना न्याय देण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून दिवस-रात्र मी काम करेन एससी एसटी ओबीसी चे युवकांना एकत्र करून महापुरुषांचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा काम मी करेन, ओबीसींचे हक्क-अधिकार बेरोजगारी युवकांसाठी, महिला सबलीकरण करण्यासाठी मी प्रयत्न करेन असे ते म्हणाले यावेळी बहुजन सत्यशोधक संघाचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन वाघमारे खरेदी-विक्री संघाचे संचालक नारायणजी गायकवाड रुई माजी सरपंच बाळासाहेब झेंडे न्यू महाराष्ट्र न्यूज चे संपादक महावीर वजाळे एबीपी प्लस चे संपादक क्रांतीदीप लोंढे महेश गायकवाड लखन वाघमारे सतीश वाघमारे माळशिरस तालुका अध्यक्ष मोहम्मद शेख जिल्हा उपाध्यक्ष महादेव लोंढे युवक नेते तुकाराम बनसोडे हे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment