Breaking

Saturday, 18 September 2021

संपादक/उस उत्पादक शेतकरी व ऊस वाहतूकदार यांच्या विविध मागण्यांसाठी जनशक्ती संघटना अतुल खुपसे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्र्यांच्या घरासमोर धरणे आंदोलन करणार.


जनशक्ती संघटनेचे आंदोलन 
*ऊस उत्पादक शेतकरी व वाहतूक ठेकेदार यांच्या विविध मागणीसाठी अतुल खुपसे पाटिल यांच्या नेतृत्वात पालकमंत्र्यांच्या घरासमोर धरणे आंदोलन*
नांदेड: ऊस उत्पादक शेतकरी व ऊस वाहतूक ठेकेदार यांच्या विविध मागण्यांसाठी जनशक्ती संघटनेचे संस्थापक अतुल खूपसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्री यांच्या निवासस्थानासमोर दि. 2 ऑक्टोंबर रोजी धरणे आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
या आंदोलनाला विविध सामाजिक संघटना तसेच शेतकरी संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना शासनाच्या नियमाप्रमाणे एफ आर पी 14 दिवसाच्या आत एकरकमी द्यावी तसेच विलंब झाल्यास बँकेच्या व्याजा प्रमाणे शेतकऱ्यांना रक्कम अदा करण्यात यावी, कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी  बांधावर जाऊन उसाची रिकवरी तपासून त्याप्रमाणे भाव द्यावा, शेतकऱ्यांना व ऊस वाहतूक ठेकेदारांना कोणत्याही वजन काट्यावर उसाची मोजणी करण्याची परवानगी द्यावी, डिझेल टायर, ओईल वाहनचालकांची पगार व भत्ते प्रचंड प्रमाणात वाढले आहेत. यामुळे पूर्वीच्या वाहतूक दरापेक्षा 50% वाहतूक तसेच तोडणी दर वाढून मिळावेत, वाहतूक ठेकेदारांना साखळी पद्धतीने आर्थिक जबाबदारी न टाकता वैयक्तिक करार करावेत, वाहनधारकांना ॲडव्हान्स देण्यात येणाऱ्या रकमेची कारखाना व वाहतूक ठेकेदार दोघांनी संयुक्तपणे आर्थिक जबाबदारी घ्यावी, ऊस तोडणी मजुरांना देण्यात येणारा ॲडव्हान्स दिनांक व वेळ ठरवून कारखाना प्रशासनाच्या नियंत्रणात वाटप करण्यात यावा. अशा विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे .
निवेदनावर  जनशक्ती संघटना प्रदेश कार्याध्यक्ष उमाकांत तिडके पाटील, जनशक्ती संघटना मराठवाडा प्रवक्ता विजय सुर्यवंशी पाटील, जनशक्ती संघटना जिल्हाध्यक्ष बाळू शिरफुले पाटील, उपजिल्हाप्रमुख शिवाजीराव देशमुख, शिवसंग्राम संघटना मराठवाडा अध्यक्ष सुनील पाटील हराळे, स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष हनुमंतराव राजेगोरे, अखिल भारतीय छावा जिल्हाध्यक्ष दशरथ कपाटे, अ.भा. प्रहार संस्थापक अध्यक्ष शिवाजी पावडे, हदगाव तालुका अध्यक्ष संदीप पाटील निर्मल नांदेड उपतालुकाप्रमुख रंगराव देशमुख यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


No comments:

Post a Comment