Breaking

Tuesday, 10 August 2021

अकलूज-श्रीपूर प्रतिनिधी/ बाळासाहेब ओहोळ - श्रीपूर येथील दलित वसाहत साठ वर्षांच्या कालावधीनंतरही विकासापासून दुर्लक्षीतच.


*श्रीपूर येथील दलित वसाहत साठ वर्षांच्या कालावधी नंतरही विकासकामा पासून दुर्लक्षित*

*श्रीपूर*

येथील दलित वसाहत असलेलं मिलिंद नगर साठ वर्षे झाली आहेत पण या वसाहतीत शासनाच्या कोणत्याही सुविधा  विकासकामे झाली नसल्याने येथील नागरिकांना दररोज अनेक अडचणी समस्या गैरसोयीचा सामना करावा लागतो आहे या वसाहतीकडे स्थानिक लोकप्रतिनिधी  प्रशासन यांचे कसलेही लक्ष नाही  मिलिंदनगर या नावाने ओळखली जाणारी ही वसाहत आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते असणारी अशी ओळख आहे या वसाहतीत रहाणारे नागरिक हे आगाशे यांच्या साखर कारखान्यात नोकरी साठी आपलं मुळ गाव सोडून उदरनिर्वाह करण्यासाठी आले आहेत जवळपास ती पिढी सेवानिवृत्त झालीं बहुतांश लोक हयात नाहीत त्यांची मुले नातवंडे सध्या येथे कायमस्वरूपी रहात आहेत सदर वसाहतीची जागा दि बृहन महाराष्ट्र शुगर सिंडीकेट लि कंपनी मालकीची होती ती जागा कंपनी व्यवस्थापनाने गुंठेवारी पध्दतीने विकत दिली आहे या वसाहतीत रहाणारे त्या जागेचे मालक झाले आहेत  मात्र या दलित वस्तीत रस्ते नाहीत गटारी नाहीत सार्वजनिक वीजेची सोय नाही या वस्तीतील कचरा उचलला जात नाही  सार्वजनिक पाणीपुरवठा योजना नाही एकंदरीत ही वस्ती दुर्लक्षित आहे की ठेवली जाते हे समजतं नाही असा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे  या भागाचे प्रतिनिधित्व करणारे माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनराव शिंदे लोकसभा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे फक्त निवडणूक आल्यावरच प्रचार करण्यासाठी श्रीपूरला येतात या वस्तीत येतं नाहीत त्यांचे कार्यकर्ते मते मागण्यासाठी फिरकत असतात  आता महाळुंग श्रीपूर नगरपंचायत झाली आहे या अगोदर ग्रामपंचायत असताना कोणत्याही लोकप्रतिनिधी नी मिलिंद नगर येथील दलित वस्तीचे प्रश्न सोडवले नाहीत विकास कामे केली नाहीत स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षांनंतर ही श्रीपूर येथील दलित समाज उपेक्षित वंचित दुर्लक्षित  आहे याचे उत्तर शोधावे लागेल  प्रश्न असा पडतो की आता पर्यंत महाळुंग ग्रामपंचायत येथील दलित वस्ती सुधार निधी कुठे वापरत होती किंवा त्या निधीचे काय करतं होती पंचवीस वर्षांचा लेखाजोखा मांडला तर आता पर्यंतचा दलित वस्ती सुधार योजना निधी कोणी हडप केला की शासनाकडे परत पाठविला.

No comments:

Post a Comment