Breaking

Tuesday, 8 June 2021

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर- मराठा आरक्षण अल्टीमेट संपला, आता मराठ्यांचा एल्गार होणार, रायगडावरून संभाजीराजेंची आंदोलनाची घोषणा.


मराठा आरक्षण : अल्टिमेट संपला, आता मराठ्यांचा एल्गार होणार ! रायगडावरून संभाजीराजेंची आंदोलनाची घोषणा.

VBP न्यूज सोमवार, जून ०७, २०२१

मराठा आरक्षण : खासदार संभाजीराजे यांनी राज्य सरकारला सहा जून पर्यंत काही मागण्या पूर्ण करण्या संदर्भात अल्टिमेट दिला होता, मात्र  कोणतीही कार्यवाही झाली नाही, त्यामुळे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी अखेर काल रायगडावरून मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाची घोषणा केली आहे . येत्या 16 जून रोजी मराठा आरक्षणासाठी पहिला मोर्चा काढण्यात येणार आहे . शिवराज्याभिषेक सोहळा निमित्ताने कार्यक्रमात ते बोलत होते. 
कोल्हापूरमधून ज्या राजश्री शाहू महाराजांनी आरक्षणाची सुरुवात केली, त्यांच्या  समाधीस्थळावरून हा मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा संभाजीराजे  छत्रपती यांनी केली आहे . 348 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने रायगडावर भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं . त्यावेळी संभाजीराजे  छत्रपती यांनी आंदोलनाची घोषणा करत सत्ताधाऱ्यांना इशारे दिले.
आधीचं आणि आजचं सरकार मराठा आरक्षणावर एकमेकांकडे बोट दाखवत आहेत . तुम्ही खेळ सुरू केला आहे का ? खेळ करू नका . मी संयमी आहे . त्याचा मला अभिमान आहे .  तुम्ही माझा संयम पाहिला . आता संयमी राहणार नाही . आता काय होईल ते होईल . मी मेलो तरी चालेल पण मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही , असा संभाजी छत्रपती यांनी दिला .
तुम्ही माझा संयम पाहिला . आता संयमी राहणार नाही . आता काय होईल ते होईल . मी मेलो तरी चालेल पण मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही , असा इशारा संभाजीराजे छत्रपती यांनी दिला . लोकं नाराज झाले तरी चालतील . पण मी समाजाला वेठीस धरणार नाही . दिशाभूल करणं आमच्या रक्तात नाही . शिवभक्तांचा मला पाठिंबा आहे . तर काही शिवभक्त माझ्यावर नाराज आहेत . पण कोरोनाचं संकट असल्याने काहीच करता येत नाही . माझं काही चुकलं असेल तर मी दिलगिर आहे . आपण जगलो तर महाराजांचे विचार पुढे घेऊन जाऊ , असं संभाजीराजे  छत्रपती म्हणाले.

No comments:

Post a Comment