क्रांतिवीर बिरसा मुंडा यांची बेंबळे येथे जयंती मोठ्या उत्साहात साजरी
टेंभुर्णी-प्रतिनिधी
क्रांतिवीर बिरसा मुंडा यांची ग्रामपंचायत बेंबळे येथे जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी बेंबळे गावचे पोलीस पाटील बिभीषण किर्ते यांनी त्यांचे मनोगत मांडताना सांगितले की, क्रांतिवीर बिरसा मुंडा यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात मोठे योगदान दिलेले आहे. त्यांचे योगदान हे कधीही विसरता येणार नाही. त्यांच्या लढ्यामध्ये सर्व जाती-धर्माचे लोक होते. या सर्वांना घेऊन त्यांनी स्वातंत्र्याची मशाल धगधगती ठेवली होती. अशा प्रकारचे उदगार पोलीस पाटील बिभिशन किर्ते यांनी काढले.
या कार्यक्रमासाठी बेंबळे गावाचे ग्रामसेवक मधुकर माने गावचे ज्येष्ठ नेते गोविंद भोसले सरपंच- विजय पवार, ग्रामपंचायत सदस्य- दादा काळे, तसेच माढा तालुका पारधी समाज उपाध्यक्ष- बापूराव काळे, ज्ञानेश्वर काळे, मिथुन भोसले, चेतन काळे, निवास काळे, सिद्धेश्वर शिंदे, संतोष शिंदे, अमोल भोसले, विनोद भोसले, महेश पवार, अविनाश काळे, महादेव काळे, युवराज भोसले, शिवानंद भोसले, धनाजी कदम, आद्रक भोसले आदिजन उपस्थित होते.


No comments:
Post a Comment