सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर : - कुर्डुवाडीता.माढा येथील बंद अवस्थेत असलेल्या टोल नाक्यावर थांबून वाहनांवर कारवाई करणे सुरू असताना त्या ठिकाणी सर्वसामान्य व्यक्ती थांबलेला दिसला की त्याला वाहतूक पोलीस अरेरावी करीत हुसकावून लावत आहेत. तिथे बार्शीला जाण्यासाठी थांबलेल्या प्रवाशांना उद्धट बोलून तेथून हाकलून लावत आहेत याचे कारण म्हणजे ‘वाहतूक पोलिसांचा गोरख धंदा’ कुणाच्या नजरेसमोर येऊ नये.
‘पोलीस खाते’ हे नाव समोर आले की, अनेकजण खाते या शब्दाचा दुसरा अर्थ घेतात नव्हे घेतातच. याचे कारणही कुठेच लपून राहिलेले नाही. काही कर्मचारी आणि अधिकारी ‘खातात’ म्हणून संपूर्ण पोलीस खात्याचे नाव कायम बदनाम राहिले आहे.
कुर्डुवाडी शहराबाहेरून टेम्भुर्णी बार्शी रस्ता आहे. हा रस्ता जास्त रहदारीचा असून या रस्त्यावरून २४ तास वाहतूक सुरू असते. बायपास येथील बंद अवस्थेत असलेल्या टोल नाक्यावर थांबून वाहतूक पोलीस वाहनांवर कारवाई करीत असतात. तसे पाहिले तर पंढरपूर चौक येथे वाहतूक पोलिसांनी नितांत गरज भासत आहे. या ठिकाणी चुकीच्या दिशेने वाहने वळवल्याने दररोज अपघात होत आहेत. जनसंवाद लाईव्ह ने अनेकवेळा पाठपुरावा केला आहे.
सोमवार दि.२२ रोजी सायंकाळी६ च्या दरम्यान या ठिकाणी ४ पोलीस वाहनाची तपासणी करीत होते. समोरून जात असताना काहीतरी घोटाळा होत असल्याचे दिसून आल्याने त्या ठिकाणी जाऊन प्रवाशी असल्याचे भासवले. त्यावेळी कर्तव्यावर असलेले श्री.पवार यांनी उर्मट भाषा वापरून सदरील व्यक्तीस तिथून हकलण्याचा प्रयत्न केला. पण तो प्रवाशी पण जिद्दी असल्याने त्याने पोलिसाने वाहन अडवून वाहनचालकाकडून पैसे घेताना कॅमेऱ्यात कैद केले.
कुर्डुवाडी शहर आणि परिसरातील दररोज ये-जा करणारे मोटारसायकलस्वार आणि वाहन चालक लायसन्स दाखवून बेजारझाले असून या रोजच्या त्रासातून केव्हा सुटका होणार याच्या प्रतीक्षेत असले तरी पंढरपूर चौकातून उलट दिशेने होणारी वाहतूक केव्हा बंद होणार हा जनतेला पडलेला प्रश्न गेल्या वर्षभरापासून अद्याप सुटलेला नाही.
वाहन चालकांनी स्वतःहून जर वाहतुकीचे नियम पाळले तर वाहतूक पोलिसांनी गरजच भासणार नसल्याचे जाणकार नागरिकांचे मत आहे. अनेक वाहनांना टेल लॅम्प, इंडिकेटर नसल्याने रात्रीच्या वेळी अपघाताचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येते.
No comments:
Post a Comment