Breaking

Friday, 27 August 2021

सातारा जिल्हा प्रतिनिधी/ मारूती सोमुत्ते - सुपने येथे प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोविड योद्ध्यांसोबत हिंदू एकतेच्यावतीने रक्षाबंधन सण साजरा.


सुपने_येथे_प्रा_आ_केंद्रातील_कोविड_योध्यांसोबत हिंदू_एकतेच्यावतीने_रक्षाबंधन_सण_साजरा..
          हिंदू एकतेचे तालुकाध्यक्ष श्री_तुषार_उर्फ_गणेश_पाटील यांनी सामजिक बांधिलकी जपत #सुपने येथील #प्राथमिक_आरोग्य_केंद्रातील वैद्यकीय_अधिकारी व #परिचारिका यांच्याकडून राखी बांधून सण साजरा केला..
      सुपने येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून #डॉ_स्नेहा_हुंद्रे कार्यरत आहेत,गेली दोन वर्षे झाले संपूर्ण देश कोरोनोशी झुंज देतोय, सुपने आरोग्यकेंद्रांतर्गत जवळपास  21 गावे येतात,महिला अधिकारी असून देखील वैद्यकीय अधिकारी यांनी परिचारिका तसेच इतर कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन कोविड काळात फार मोठे काम केले आहे, कोरोनो काळात प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रत्येक गावातील कोरोनो रुगांवर उपचार,लसीकरण मोहीम तसेच कोविड टेस्टिंग,रुग्ण तपासणी या प्रकारच्या सुविधा या आरोग्य केंद्रामार्फत पुरवल्या जातात...
    गणेश पाटील म्हणाले सुपने प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व परिचारिका यांनी केलेलं कोरोनो काळातील कार्य फार मोठे आहे,विभागाच्या वतीने त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी,तसेच त्यांना प्रोत्साहन मिळणेसाठी सदरचा उपक्रम राबविण्यात आला..
     यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ स्नेहा हुंद्रे,हिंदू एकतेचे तालुकाध्यक्ष श्री गणेश पाटील ,समुदाय आरोग्य अधिकारी डॉ प्राजक्ता वाठारे,आरोग्य सहाय्यीका पाटोळे सिस्टर,आरोग्य सेविका शोभा यादव,स्त्री परिचर वर्षा म्हेत्रे,फार्मासिस्ट रमेश पाटील,लॅब  टेक्निशियन संतोष कदम ,शुभम पडवळ,राज देसाई,वैभव देवकर उपस्थित होते

No comments:

Post a Comment