Breaking

Friday, 27 August 2021

अकलूज-श्रीपूर प्रतिनिधी/ बाळासाहेब ओहोळ - लोकनेते राजाभाऊ सरवदे यांच्या वाढदिवसानिमित्त जेष्ठ कार्यकर्त्यांचा श्रीपूर येथे सत्कार व जिलेबी वाटपाचा कार्यक्रम संपन्न.


*लोकनेते राजाभाऊ सरवदे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा श्रीपूर येथे सत्कार व जिलेबी वाटप*

*श्रीपूर*

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस लोकनेते राजाभाऊ सरवदे यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीपूर पूर्व भागातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा आज डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने करण्यात आला त्यावेळी ज्येष्ठ कार्यकर्त्यांना जिलेबी वाटप करण्यात आली ज्यांचे वय साठ वर्षांहून अधिक आहे तसेच आंबेडकरी चळवळीत ज्यांनी  आपलं योगदान दिले आहे तसेच मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनात सहभाग घेतला अशा उपस्थित कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला यामध्ये मारुती भोसले संदिपान आठवले चरण बनसोडे महादेव आठवले भरत बनसोडे ज्ञानदेव कसबे सुरेश जगधने  तुकाराम बाबर सुखदेव बनसोडे मोहन लोंढे नागनाथ वाघमारे प्रभाकर सुरवसे   मलंग लोंढे अहमद शेख  दिलीप जगधने इत्यादी ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचे संयोजन व नियोजन ज्येष्ठ पत्रकार बी टी शिवशरण तुकाराम बाबर गौतम आठवले राजू शेंडगे यांनी केले  कार्यक्रमाचे प्रास्ताविक आरपीआयचे ज्येष्ठ कार्यकर्ते तुकाराम बाबर यांनी केले  या कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार प्रकाश केसकर आवर्जुन उपस्थित होते उपस्थित सर्वांचे स्वागत व आभार बी टी शिवशरण यांनी मानले.

No comments:

Post a Comment