“…तर नारायण राणेंची अटक ही बेकायदेशीरच मानायला हवी”;
संजय राऊत रोखठोकच बोलले.......
जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेनेतील संघर्ष अद्यापही कायम आहे.
एकीकडे नारायण राणे यांनी अटकेनंतर पुन्हा एकदा शिवसेना आणि ठाकरे कुटुंबावर निशाणा साधला असून अनेक गोष्टी उघड करण्याची जाहीर धमकी दिली आहे.
तर दुसरीकडे शिवसेनेकडून नारायण राणेंना जशास तसं उत्तर दिलं जात आहे.
दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा सामनामधून नारायण राणेंवर निशाणा साधला आहे.
काय म्हटलं आहे रोखठोकमध्ये .....
“केंद्रातले एक मंत्री श्री. नारायण राणे महाराष्ट्रात भा.ज.पा.च्या जन आशीर्वाद यात्रेसाठी आले. त्या यात्रेची त्यांनी येडय़ांची जत्रा केली.
मोदी सरकारातील अनेक मंत्री देशभरात अशा जन आशीर्वाद यात्रा करीत फिरत आहेत.
महाराष्ट्रात भागवत कराड,
भारती पवार, कपिल पाटील फिरत आहेत.
त्या सर्व यात्रा सुरळीत पार पडत आहेत.
फक्त श्री. राणे यांनी परंपरेने गोंधळ घातला.
त्यामुळे मोदींच्या यात्रेचे महत्त्वच नष्ट झाले,”
अशी टीका संजय राऊतांनी केली आहे,
सार्वजनिक जीवनातील व्यक्तीने परंपरा, प्रतिष्ठा सोडली की…
“महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष विरोधी बाकावर आहे.
विरोधात बसणे त्यांना कमीपणाचे वाटते.
त्याच न्यूनगंडातून भा.ज.पा. राज्य सरकारवर घाणेरडय़ा पद्धतीने हल्ले करीत आहे.
स्वतः हल्ले करून थकले तेव्हा ते काम त्यांनी बाहेरून आलेल्या राणे यांच्यासारख्या नेत्यांना दिले.
राणे जे करीत आहेत त्यामुळे जत्रेचा तंबूच उधळला गेला.
सार्वजनिक जीवनातील व्यक्तीने परंपरा, प्रतिष्ठा सोडली की काय घडते, याचा अनुभव सध्या महाराष्ट्र घेत आहे.
गेले चारेक दिवस इलेक्ट्रॉनिक मीडियाला चोवीस तास रटरटणारे खाद्य मिळाले,
पण राज्याची इभ्रत या सर्व प्रकरणात मातीमोल झाली.


No comments:
Post a Comment