Breaking

Monday, 30 August 2021

मध्यप्रदेश/ चोर असल्याच्या संशयावरून ट्रकला बांधून फरफटत नेलं.


धक्कादायक 
 चोर असल्याच्या संशयावरुन ट्रकला बांधून फरफटत नेलं......
 
मध्य प्रदेशच्या निमचमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 
चोरीच्या संशयातून एका व्यक्तीला  बेदम मारहाण करण्यात आली. 
एवढंच नव्हे तर त्याला पिकअप गाडीसोबत बांधून फरफटत नेण्यात आले. 
यातच त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. 
या प्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. 
आरोपींनी या धक्कादायक घटनेचा आणि क्रुरतेचा व्हि.डि.ओ. देखील रेकॉर्ड केलाय. 
या घटनेचा व्हि.डि.ओ. सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 
दरम्यान, हे प्रकरण समोर आल्यानंतर आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी, 
अशी मागणी जोर धरू लागली आहे. 
मृताचे नाव कान्हा ऊर्फ कन्हैया भील (वय ४५ वर्षे) असून तो बाणदा गावचा रहिवासी होता. 
ही घटना जेतिया गावात घडली. एका आदिवासी व्यक्तीला चोर असल्याच्या संशयातून काही लोकांनी बेदम मारहाण केली. 
त्यानंतर त्याला पिकअप वाहनासोबत दोरीने बांधून फरफटत दूरपर्यंत नेले. 
पुन्हा त्याला मारहाण करून आरोपींनी पोलीस हेल्पलाईन नंबरवर फोन करून चोर पकडल्याचं सांगितलं. 
त्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला जवळच्या आरोग्य केंद्रात नेले. 
जखमा जास्त असल्याने त्याला नीमच जिल्हा रूग्णालयात पाठवण्यात आले. 
तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. 
आरोपींनी व्हायरल केलेल्या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. 
नीमचचे एस.पी. सूरज वर्मा यांनी याप्रकरणी ८ जणांविरोधात हत्या आणि एट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. 
प्रकरणातील मुख्य आरोपी महेंद्रसह आणखी चार जणांना अटक करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment