Breaking

Monday, 16 August 2021

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - माढा तालुक्यातील मौजे बावी गावची कन्या स्वप्नजा सुनिल मोरे यांचा सन्मान.


15 ऑगस्ट रोजी कृषी आयुक्तलयामार्फत कृषी विभागात सन 2020-2021 मध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आधिकारी, कर्मचारी यांचा प्रशस्तीपत्रक प्रदान करून सन्मान करण्यात आला.

 यामध्ये माढा तालुक्यातील बावी गावची कन्या  स्वप्नजा सुनिल मोरे (कृषी अधिकारी, आत्मा, विभागीय कृषी सहसंचालक लातूर) यांची उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल लातूर विभागातून निवड करून त्यांचा प्रशस्तीपत्रक देवून सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी आपल्या मुलीने केलेल्या चांगल्या कामाचे प्रशस्तीपत्ररुपी कौतुक  झाल्याबद्दलचे समाधान मोरे यांच्या आई वडिलांनी व्यक्त केली आणि उत्तरोत्तर तिची प्रशासकीय कामगिरी अशीच बहरत जावी अशी कामना केली.

No comments:

Post a Comment