करमाळा ÷ कोरोनाच्या लोकडाऊन मुळे आज बँड , बॅन्जो ,वाजंत्री व्यावसायिकावर उपासमारीची वेळ आली असून जिल्ह्यातील व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका गेल्या दोन वर्षाभरापासून सहन करावा लागत आहे . सध्या सोलापूर जिल्ह्यातील लोकडाऊन हटवले असून सर्व दुकाने सकाळी ७ ते ४ वाजेपर्यंत खुली ठेवण्याचे आदेश दिले आहे. परंतु या आदेशामध्ये बँड,बॅन्जो,वाजंत्री व्यवसायाचा कुठल्याही प्रकारचा विचार अथवा उल्लेख केलेला नाही . तसेच या आदेशामध्ये लग्न समारंभास परवानगी दिली आहे . त्यामुळे बँड , बॅन्जो,वाजंत्री , व्यावसायिकांना नियमाप्रमाणे परवानगी द्यावी अशी मागणी बॅन्ड असोसिएशन चे उपाध्यक्ष युवराज जगताप यांनी प्रसिद्धी ईमेलद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांना केली. त्यात ते बँड ,बॅन्जो,वाजंत्री , डीजे सिस्टीम व्यावसायिकांना इतर कोणतेही उत्पन्नाचे साधन नसल्यामुळे त्यांच्या कुटुंबाची उपजीविका भागविण्यासाठी मोठ्या ' प्रमाणात अडचण निर्माण झाली असल्यामुळे सदरील व्यावसायिकांना परवानगी द्यावी अशी मागणी उपाध्यक्ष युवराज जगताप व बॅन्ड असोसिएशनचे इसाक भाई पठाण,नजीर भाई पठाण,मुकतार पठाण, महमद हाफिज कुरेशी,नासीर कुरेशी,मस्तान कुरेशी,पांडुरंग जगताप विशाल लांडगे,गोरख कांबळे यांनी केली आहे .
कोरोनाच्या लोकडाऊन मुळे आज बँड , बॅन्जो ,वाजंत्री व्यावसायिकावर उपासमारीची वेळ आली असून जिल्ह्यातील व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका गेल्या दोन वर्षाभरापासून सहन करावा लागत आहे . सध्या सोलापूर जिल्ह्यातील लोकडाऊन हटवले असून सर्व दुकाने सकाळी ७ ते ४ वाजेपर्यंत खुली ठेवण्याचे आदेश दिले आहे. परंतु या आदेशामध्ये बँड,बॅन्जो,वाजंत्री व्यवसायाचा कुठल्याही प्रकारचा विचार अथवा उल्लेख केलेला नाही . तसेच या आदेशामध्ये लग्न समारंभास परवानगी दिली आहे . त्यामुळे बँड , बॅन्जो,वाजंत्री , व्यावसायिकांना नियमाप्रमाणे परवानगी द्यावी अशी मागणी बॅन्ड असोसिएशन चे उपाध्यक्ष युवराज जगताप यांनी प्रसिद्धी ईमेलद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांना केली. त्यात ते बँड ,बॅन्जो,वाजंत्री , डीजे सिस्टीम व्यावसायिकांना इतर कोणतेही उत्पन्नाचे साधन नसल्यामुळे त्यांच्या कुटुंबाची उपजीविका भागविण्यासाठी मोठ्या ' प्रमाणात अडचण निर्माण झाली असल्यामुळे सदरील व्यावसायिकांना परवानगी द्यावी अशी मागणी उपाध्यक्ष युवराज जगताप व बॅन्ड असोसिएशनचे इसाक भाई पठाण,नजीर भाई पठाण,मुकतार पठाण, महमद हाफिज कुरेशी,नासीर कुरेशी,मस्तान कुरेशी,पांडुरंग जगताप विशाल लांडगे,गोरख कांबळे यांनी केली आहे .


No comments:
Post a Comment