गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत कोरोनाचा समावेश करावा.रयत क्रांतीचे प्रा सुहास पाटील यांनी शासनाकडे केली मागणी.- लोकनेते गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत कोरोना या रोगाचा त्वरित समावेश करावा असे रयत क्रांती संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ई-मेलद्वारे मागणी केली असल्याची माहिती रयत क्रांती संघटनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा सुहास पाटील यांनी सांगितले.सध्या संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना या साथीच्या रोगाने प्रचंड थैमान घातले आहे.या रोगामुळे ग्रामीण भागातील बहुतांश शेतकरी कुटुंबातील व्यक्ती मृत्यू पावलेल्या आहेत.शेतकरी कुटुंबांना कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे.गेले १६ महिने सतत लाॅकडाऊन च्या परिणामामुळे शेतकऱ्यांची शेती उद्ध्वस्त झालेली आहे.महाराष्ट्रातील शेतकरी हा कर्जबाजारी झाला असून आर्थिक विवंचनेत सापडला आहे.त्यामुळे कोरोना रोगाच्या उपचारावरील वैद्यकीय खर्च त्याला परवडत नाही.तरी सद्यस्थितीत चालू असलेल्या सर्पदंश, विंचूदंश, वीज पडून, पाण्यात बुडून, विजेचा धक्का लागून यापैकी कोणत्याही कारणाने मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत शासनाकडून २ लाख रुपयांची मदत मिळते.तरी याच योजनेअंतर्गत कोरोना साथीचा समावेश केल्यास कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या शेतकरी कुटुंबीयांना २ लाखांची मदत मिळेल.जेणेकरून त्या शेतकरी कुटुंबाला आधार मिळेल.तरी शासनाने लवकरात लवकर शेतकरी अपघात विमा योजनेत कोरोनाचा समावेश करावा असे रयत क्रांतीचे प्रा. सुहास पाटील यांनी मागणी केली आहे.
Saturday, 5 June 2021
Home
/
महाराष्ट्र
/
सोलापूर
/
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत कोरोनाचा समावेश करावा...प्रा. सुहास पाटील.
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत कोरोनाचा समावेश करावा...प्रा. सुहास पाटील.
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment