Breaking

Saturday, 5 June 2021

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - सोलापूर नंतर आता मराठवाडा विरूद्ध इंदापूर पाणी पेटवून नवा वाद लावण्याचा भरणे मामांचा प्रयत्न...बाबासाहेब चव्हाण.


सोलापूर नंतर आता मराठवाडा विरुद्ध इंदापूर पाणी पेटवून नवा वाद लावण्याचा भरणे मामांचा प्रयत्न.

बाबासाहेब चव्हाण.भिम ब्रिगेड सामाजिक संघटना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष.

उजनी तरटगांव गेटवर पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष तसेच भरणे मामांचे अतिशय निकटवर्तीय समजले जाणारे संजय सोनवणे यांनी तीन तारखेपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.मराठवाड्याला एकवीस टीएमसी पाणी देण्याचा प्रस्ताव रद्द करावा म्हणून हे आंदोलन सुरू केले आहे.हा एक प्रकारे मराठवाडयातील शेतकर्यावर आणि जनतेवर खुप मोठा अन्याय आहे.आगोदर सोलापूर जिल्ह्यातील शेतकर्यावर आणि जनतेवर अन्याय केला.सोलापूर जिल्ह्याच्या हक्काचे पाच टीएमसी पाणी सांडपाण्याच्या नावाखाली इंदापूरला पळवण्याचा  प्रयत्न केला.पण तो पाणी पळवण्याचा दत्ता मामा भरणेंचा जो डाव होता त्याच्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील अनेक शेतकरी संघटना रस्त्यावर उतरल्या आणि भरणे मामांचा पाणी पळवण्याचा डाव हाणून पाडला तशाच प्रकारे आजही एक महीन्याच्या आतमध्येच मराठवाडा विरुद्ध इंदापूर वाद लावण्याचा भरणे मामांचा प्रयत्न चालू आहे.इंदापुर तालुक्यातील बावीस गावातील शेतकर्याने आणि जनतेने इंदापूर चे लोकप्रतिनिधी म्हणून आणि सत्ताधारी म्हणून भरणे मामांना च प्रश्न विचारला पाहिजे ज्या वेळेस मराठवाड्याला एकवीस टीएमसी पाणी देण्याचा प्रस्ताव मंजूर झाला त्याच वेळेस इंदापूर तालुक्यातील बावीस गावांना पाणी देण्याचा देखील प्रस्ताव मंजूर झाला होता.मग आमच्या हक्काचे पाणी गेलं कुठं इंदापूरच्या बावीस गावांच पाणी पळवल कोणी असा जाब इंदापूर मधल्या शेतकर्याने आणि जनतेने भरणे मामांना विचारला पाहिजे भरणे मामा हे इंदापूर तालुक्यात स्वताच राजकीय अस्तित्व कायम टिकून राहण्यासाठी सोलापूर मराठवाडा विरुद्ध इंदापूरच्या शेतकर्यांचे भांडण लावुन इंदापूरच्या शेतकर्यांची जाणिवपूर्वक दिशाभूल करत आहेत.मराठवाड्यातील अनेक भाग दुष्काळग्रस्त असल्या कारणाने मराठवाड्यातील माझा शेतकरी बांधव आत्महत्या करत आहे.सर्वात जास्त कर्ज बाजारी माझा शेतकरी बांधव मराठवाड्यातील च आहे.अशा अनेक गोष्टींचा मराठवाडा हा दुष्काळग्रस्त भाग असल्या कारणाने तेथील माझ्या शेतकरी बांधवांना सामना करावा लागतो तरी अशा परिस्थितीत मध्ये जर कोणी सत्तेचा गैर वापर करून मराठवाड्याच्या हक्काचे पाणी अडवण्याचा प्रयत्न केला तर मी.बाबासाहेब चव्हाण भिम ब्रिगेड सामाजिक संघटनेच्या वतीने अनेक सामाजिक संघटना आणि शेतकरी संघटनाना एकत्रित घेऊन रस्त्यावर उतरू आणि मराठवाड्याचा पाणी अडवण्याचा भरणे मामांचा डाव हाणून पाडू असा इशारा भिम ब्रिगेड सामाजिक संघटनेचे पश्र्चिम महाराष्ट्र अध्यक्ष.बाबासाहेब चव्हाण यांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment