खाजगी दुध संघाची मक्तेदारी कमी करून सरकारने दुध दरवाढ द्यावी.रयत क्रांतीचे प्रा सुहास पाटील. टेंभूर्णी(प्रतिनीधी)- संपूर्ण महाराष्ट्रातील खाजगी दूध संघाची मक्तेदारी दूध व्यवसायात असून लाॅकडाऊनच्या नावाखाली दूध संघांनी दर कमी केले आहेत.त्याचा फटका दूध उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे.त्यामुळे खाजगी दूध संघांची मक्तेदारी कमी करून सरकारने दुधाची दरवाढ लवकरात लवकर करावी असे आवाहन रयत क्रांती संघटनेचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रा सुहास पाटील यांनी केले. रांजणी तालुका माढा येथे रयत क्रांती संघटनेच्यावतीने सरकारच्या निषेधात्मक पुतळ्याला दुग्धाभिषेक करीत आंदोलन करण्यात आले.यावेळी बोलताना प्रा पाटील म्हणाले,सध्या महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकर्याच्या दुधाला प्रति लिटर १८ ते २० रूपये भाव मिळत आहे.त्यामुळे दुध व्यावसायीक उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. तरी सरकारने गाईच्या दुधाला प्रति लिटर ३० रुपये व म्हशीच्या दुधाला प्रति लिटर ६० रुपये हमी भाव द्यावा. पशुखाद्याचे दर वाढले असून शेतकर्याला वैरणही विकत आणावी लागते.त्यामुळे शेतकऱ्यांचा दुग्ध व्यवसाय संकटात सापडलेला आहे. सरकारने येत्या दहा दिवसात दुधाला दरवाढ जाहीर करावी अन्यथा रयत क्रांती संघटना राज्यातील दूध पुरवठा बंद पाडणार असे आक्रमक भूमिका प्रा सुहास पाटील यांनी बोलून दाखवली.यावेळी शेतकऱ्यांच्या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी घोषणाबाजी करण्यात आल्या.यावेळी रांझणीचे माजी सरपंच आप्पा यादव,खरेदी विक्री संघाचे माजी संचालक नारायण गायकवाड,विकास चव्हाण,ओंकार गाडे,पिनू पोळ, अनिल जाधव,देवा माने,गणेश चव्हाण, आबा बागल,भैरु चव्हाण,राहुल पोळ, गणेश पोळ,दादा मदने,अमोल जाधव, वसंत चव्हाण,टिंगरे किरण पोळ,बाळू भिसे,शिवाजी थोरात,आदी दुध ऊत्पादक शेतकरी ऊपस्थित होते.
Thursday, 10 June 2021
Home
/
टेंभूर्णी
/
सोलापूर
/
टेंभूर्णी शहर प्रतिनिधी /अक्षय खंदारे - खाजगी दूध संघाची मक्तेदारी कमी करून सरकारने दूध दरवाढ द्यावी...रयतक्रांती चे प्रा सुहास पाटील.
टेंभूर्णी शहर प्रतिनिधी /अक्षय खंदारे - खाजगी दूध संघाची मक्तेदारी कमी करून सरकारने दूध दरवाढ द्यावी...रयतक्रांती चे प्रा सुहास पाटील.
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment