Breaking

Tuesday, 8 June 2021

मोहोळ तालुका प्रतिनिधी/ संभाजी वागज - पापरी गावच्या शहा कुटूंबियांचा पर्यावरण पूरक उपक्रम.


मोहोळ तालुका प्रतिनिधी/ संभाजी वागज - पापरी गावच्या शहा कुटुंबियांचा पर्यावरण पूरक उपक्रम- याबाबत वृत्त असे की पापरी येथील वृक्ष प्रेमी सम्मेद शहा यांनी स्वतःच्या घराजवळ रोपवाटिका तयार करून लोकांना मोफत रोपे देण्याचा उपक्रम सुरू केला आहे पर्यावरण संवर्धनास हातभार लावणारा शहा कुटुंबियांचा उपक्रम गेल्या सहा वर्षापासून सुरू आहे आत्तापर्यंत त्यांनी अडीच हजारांपेक्षा जास्त रोपे मोफत दिली आहेत पापरी येथे शहा कुटुंबीयांची 11 एकर शेती आहे काही वर्षांपूर्वी सम्मेद शहा यांनी आपल्या शेतात आंब्याचे झाड लावले झाड मोठे झाल्यावर ते आंब्याच्या फळांनी लगडून गेले झाडाला लागलेली फळे साखरे सारखी गोड आहेत दरवर्षी झाडाला दोन अडीच हजार फळे येतात या झाडाला लागलेली फळे ते न विकता आपल्या नातेवाईकांना व मित्र परिवारास वाटून टाकतात अशी आंब्याची गोड झाडे सर्वत्र असावी तसेच झाडे लावून पर्यावरण वाचावे असा विचार शहा यांच्या मनात आला त्यानंतर त्यांनी आपल्या घरासमोर छोटीशी रोपवाटिका बनवण्याचा निर्णय घेतला या रोपवाटिकेतून तयार झालेली रोपे ते शाळा व सामाजिक संस्था यांना मोफत देतात घरी आंबे खाल्ले किंवा त्याचा आमरस केल्यास त्याच्या कोय टाकून न देता ते दर वर्षी त्याची पाचशेच्या वर रोपे तयार करतात वर्षभर सदर रोपे नातेवाईक मित्र राजकारणी व्यक्ती यांना कुणाचा वाढदिवस अथवा कार्यक्रम असल्यास सदर रोपे भेट देऊन त्यांचा आनंद द्विगुणित करतात पावसाळा सुरू झाला की कागदी पिशव्या मध्ये माती भरून कोयीचे रोपण केले जाते. ही रोपे बनविण्यासाठी शहा कुटुंबातील सर्व सदस्य मदत करत असतात रोज नियमितपणे या रोपांना पाणी देणे आणि त्याची वाढ कशी होईल यासाठी निगा राखली जाते तसेच आम्ही शहा यांच्याशी बातचीत केली असता आम्ही आंब्याची रोपे तयार करून वाटप करत असतो यामुळे भविष्यात मोठे वृक्ष होऊन पर्यावरण संवर्धनास हातभार लागेलच. शिवाय हजारो फळे त्यांना लागतील त्यापासून ही शेकडो झाडे बनतील ज्यांना ज्यांना अगोदर रोपे दिली आहेत ते त्याची जोपासना करत आहेत या उपक्रमातून आम्हाला मोठे समाधान मिळते असे VBP NEWS सोबत बोलताना सम्मेद शहा यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment