Breaking

Tuesday, 29 June 2021

संपादक/ विजयकुमार परबत- आ.संजय मामा शिंदे यांच्या कारखान्याने काढले मयत शेतकर्याच्या नावावरती कर्ज....माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या सह शिष्टमंडळाने घेतली जिल्हाधिकार्यांची भेट.


 आमदार संजय शिंदे यांच्या कारखान्याने काढले 'मयत' शेतकऱ्याच्या नावावर देखील कर्ज

माजी आमदार नारायण पाटील यांच्यासह शिष्टमंडळाने घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट





एकीकडे स्वतःची गडगंज प्रॉपर्टी असताना शिवाय जिल्हा परिषद अध्यक्ष होण्यासाठी कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करून लोकसभा व विधानसभा लढविणारे करमाळ्यातील आमदार संजय शिंदे यांनी शेतकऱ्यांची प्रॉपर्टी बँकेकडे गहाण ठेवली असताना दुसरीकडे अतुल खुपसे पाटील यांनी आवाज उठविताच शेतकऱ्यांच्या कर्जांना ओटीएस करुन त्यांचे आयुष्य बरबाद केले आहे. हे कमी काय, इतक्या साऱ्या उठाठेवी केल्या असताना आमदार संजय शिंदे यांच्या म्हैसगाव येथील श्री विठ्ठल कार्पोरेशन कारखान्याने चक्क मयत झालेल्या शेतकऱ्याच्या नावे कर्ज उचलल्याने मोठी खळबळ माजली असून याच कारखान्याने व रणजित शिंदे विक्रम शिंदे यांच्या  साखर कारखान्यांनी   जिल्ह्यातील वेगवेगळ्या बँकांमधून शेतकऱ्यांच्या कागदपत्रांचा गैरवापर करत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला असल्याची तक्रार करमाळा मतदार संघाचे माजी आमदार नारायण पाटील यांच्यासह शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे केली आहे.




यावेळी पत्रकाराशी संवाद साधताना माजी आमदार नारायण पाटील म्हणाले की आमदार संजय शिंदे यांच्या विठ्ठल कार्पोरेशन या कारखान्याने शेतकऱ्यांच्या नावे उचललेले कर्ज हे बेकायदेशीर असून शेतकऱ्यांना याबाबत कोणतीच कल्पना न देता शेतकऱ्यांचे आयुष्य वाटोळ करण्याचा अधिकार संजय शिंदे यांना दिलाच कुणी..? हे कमी म्हणून माढा तालुक्यातील अकुलगाव येथील आप्पा कृष्णा जगताप हे 22 जानेवारी 2011 रोजी मयत झाले आहेत तरीही या कर्तुत्ववान आमदाराने सन 2013 साली यांच्या नावे कर्ज उचलले आहे. म्हणजे हयात असणाऱ्या शेतकऱ्यांच्या डोक्यात या आमदाराने दगड घातलाच आहे, शिवाय मयताच्या नावे कर्ज घेवुन मड्याच्या टाळूवरील लोणी देखील यांनी ओरबाडून खाल्ले आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना न्याय दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.


शिवसेना नेते संजय कोकाटे म्हणाले की आमदार शिंदे बंधु व त्यांचे कुटुंबीय  यांनी पंजाब नॅशनल बँक कोथरूड, बॅंक ऑफ इंडिया कुर्डुवाडी, युनियन बॅंक कुंभार वेस सोलापूर, एचडीएफसी बॅंक टेंभुर्णी, आयडीबीआय बॅंक टेंभुर्णी, बॅंक ऑफ इंडिया बार्शी, बॅंक ऑफ इंडिया करमाळा, रत्नाकर बॅंक अकलुज, स्टेट बॅंक ऑफ इंडिया बार्शी महाराष्ट्र बॅंक कुर्डुवाडी, महाराष्ट्र बॅंक निमगाव अशा वेगवेगळ्या बॅंकामधुन शिंदे कुटुंबियांच्या यांच्या कारखान्याने सुमारे ३०० कोटी रुपयांचा बोजा शेतकऱ्यांना ७/१२ वर टाकलेला आहे त्यामुळे याची चौकशी व्हावीच शिवाय कारखान्याने जर ओटीएस करुन शेतकऱ्यांना फसविले तर याचे गंभीर परिणाम शेतकऱ्यांच्या जीवनाला छळणार आहेत त्यामुळे आम्ही असे होवु देणार नसल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.


दरम्यान आमदार संजय शिंदे रणजित शिंदे विक्रम शिंदे  यांच्या श्री विठ्ठल कार्पोरेशन बबनराव शिंदे शुगर  कमलाभवानी करमाळा  या कारखान्यानी शेतकऱ्यांची सर्व कर्जे नील करावी. यामध्ये बँकांशी कोणतीच तडजोड करू नये. अन्यथा याबाबत आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा पत्रकार परिषदेमध्ये सर्वच नेत्यांनी दिला. यावेळी शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष अतुल खुपसे पाटील, माढा तालुका भाजपाध्यक्ष योगेश बोबडे, रयत क्रांतीचे संपर्कप्रमुख प्रा.सुहास पाटील, तालुकाध्यक्ष दत्तात्रय गायकवाड, स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पाटील, रिपाई चे परमेश्वर खरात, रासप चे शहरप्रमुख सुनिल बुजुर्के, मनसे चे सागर लोकरे, शिवसेनेचे विनोद पाटील आदी उपस्थित होते. 





जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करावी

- आमदार संजय शिंदे यांच्या म्हैसगाव येथील श्री विठ्ठल कार्पोरेशन ने घेतलेल्या कर्जाचा व लुटलेल्या शेतकऱ्यांचा गाजावाजा संपूर्ण महाराष्ट्रभर होत असताना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे मात्र या प्रकरणाबाबत अनभिज्ञच कसे असा सवाल उपस्थित होत आहे त्यामुळे त्यांनी कोणाच्याही दबावाला बळी न पडता शेतकऱ्यांच्या हितासाठी या कर्ज प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करावी अन्यथा हजारो शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारासमोर बसतील


अतुल खूपसे पाटील

अध्यक्ष, शेतकरी संघर्ष समिती


No comments:

Post a Comment