पिंपळखुटे तालुका माढा येथील 10 गाळे दारिद्रय़रेषेखालील नागरिकांना न देता सन 2004- 2005 पासून 2021 पर्यंत 1 कोटी चा भ्रष्टाचार- सविस्तर वृत्त पिंपळखुटे तालुका माढा येथील ग्रामपंचायती चे असणारे सार्वजनिक 29 गाळे व दारिद्र्य रेषेखालील लोकां साठी असणारे 10 गाळे असे एकूण 39 गाळे यांचे भाडे ग्रामपंचायतीला मिळत नाही. पिंपळखुटे येथील सार्वजनिक गाळे 2004 ते 2005 मध्ये बांधण्यात आलेले आहेत पिंपळखुटे येथील दारिद्रय़रेषेखालील कुटुंबातील लोकांच्या साठी 10 गाळे बांधलेले असून त्यातील 1 ही गाळा दारिद्रय़रेषेखालील व्यक्ती ला दिला गेला नाही. पैसे असनार्या धनाडगे व्यक्तींनी दादागिरी करून गाळे बळकावले आहेत. 2004 पासून आजतागायत 10 गाळयापैकी एकही गाळयाचा ग्रामपंचायतीशी कसलाही करार नाही. तसेच ग्रामपंचायतीला 1 रूपया ही भाडे दिले गेले नाहीत.तसेच सर्व समाजासाठी असणारे ओपन चे साव॔ जनिक गाळे 29 आहेत. या 29 गाळयातील लोकांनी गाळयावर कब्जा केला आहे. यातील निम्मे गाळे तर बंदच आहेत. 2004 पासुन 1जून 2021 पर्यंत कसलाही ग्रामपंचायती शी करार झाला नाही. ग्रामपंचायतीला 29 गाळे धारक 1 रूपायही भाडे देत नाहीत. ग्रामसेवकांनी नोटीस ही दिली होती परंतु त्याचा काहीच परिणाम झाला नाही. या प्रकरणाला न्याय मिळण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य पवन बाळासाहेब पाटील हे उपविभागीय अधिकारी कार्यालय kurduwadi येथे उपोषणाला बसले होते.
Monday, 28 June 2021
Home
/
भोसरे
/
सोलापूर
/
भोसरे प्रतिनिधी/ अमोल हावळे - पिंपळखुटे येथील ग्रामपंचायतीच्या गाळ्यांसंदर्भात सदस्य बाळासाहेब पाटील यांची तक्रार.
भोसरे प्रतिनिधी/ अमोल हावळे - पिंपळखुटे येथील ग्रामपंचायतीच्या गाळ्यांसंदर्भात सदस्य बाळासाहेब पाटील यांची तक्रार.
About VBP
Chief Editor of VBPNEWS.IN
सोलापूर
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment