Breaking

Tuesday, 29 June 2021

अकलूज-श्रीपूर प्रतिनिधी/ बाळासाहेब ओहोळ- उजनी ग्रामपंचायतीने दलित वस्तीत बसविलेला हायमास्ट दिवा हलगर्जीपणामुळे 15 दिवसातच बंद.


*रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले (गट) युवक आघाडी माढा तालुक्याच्या वतीने पक्षाचे* *सरचिटणीस महादेव (दादा) साबळे यांनी सन २०१९/२० या कालावधीमध्ये* *दलित वस्ती सुधारणे अंतर्गत सिद्धार्थ नगर येथे सुमारे एक लाख चौतीस* *हजार रुपये किंमतीचा हायमास्ट दिवा दलित वस्तीतील निवडूण दिलेल्या प्रतिनिधीच्या व* *ग्रामपंचायतीच्या हलगर्जीपणामुळे दिवा जोडणी झालेपासून आजपर्यंत बंद* *आहे,समाजातील नागरिकांच्या तक्रारी पक्षाचे सरचिटणीस* *महादेव (दादा)* *साबळे यांच्याकडे* *आल्यानंतर,संबधित व्यक्तिंना दिवा चालू करण्यासाठी साबळे* *यांनी वारंवार सांगून सुद्धा राजकीय सुडापोटी* *हायमास्ट दिवा चालू करण्यासाठी ग्रामपंचायतीला अपयश आल्याने* *आज २५/६/२०२१ रोजी पंचायत समिती कुर्डूवाडी येथे पक्षाच्या* *वतीने निवेदन देण्यात आले.* 
      *या निवेदनात येणाऱ्या पंधरा दिवसांत जर हायमास्ट दिवा* *ग्रामपंचायत प्रशासनाने चालू नाही केला तर न* *ईलाजास्तव समाजातील* *उजेडापासून वंचित असणार्या कुटूंबांना घेऊन मी स्वतः पंचायत* *समिती कुर्डूवाडी येथे ठिय्या आंदोलन करण्याच्या* *मनस्थितीत आहे असेही ते यावेळी म्हणाले*

No comments:

Post a Comment