मोहोळ शहर प्रतिनिधी/ सुनिल गायकवाड - दि. 28/6/2021 ची सोलापूर जिल्ह्यातील महापालिका क्षेत्र वगळून ग्रामीण व नगरपालिका क्षेत्रातील कोविड-19 ची माहिती- सोलापूर जिल्हा परिषदेचे प्रशासन सोलापूर जिल्ह्यातील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत.
सध्याची सोलापूर जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती पाहता सोलापूर शहरातील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाला यश आले आहे परंतु सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे प्रशासन हतबल झाले आहे. प्रशासनाने सध्या ग्रामीण भागावरती लक्ष केंद्रित केले असून,
सोलापूर जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ शितलकुमार जाधव हे सोलापूर शहरासह जिल्हातील ग्रामीण भागावरती लक्ष देऊन आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ शितलकुमार जाधव यांनी सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना सर्व प्रकारचे मदत पुरविली आहे. सध्या ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे त्याला कारणही तसेच आहे, लोक विनाकारण बाहेर पडत आहेत, सोशल डिस्टंस पाळत नाहीत, गर्दीच्या ठिकाणी जातात, मास्क व सॅनिटायझर चा वापर करत नाहीत, त्यामुळे ग्रामीण भागात कोरोना दिवसेंदिवस वाढत आहे.
ग्रामीण भागातील लोकांना सोलापूर जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ शितलकुमार जाधव हे वारंवार सूचना करत आहे की सोशल डिस्टंस ठेवून वागावे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, मास्क व सॅनिटायझर वाटप चा वापर करावा, लोकांनी जर ह्या सूचना पाळल्या तर ग्रामीण भागातील कोरोना परिस्थिती लवकरच आटोक्यात येईल.
सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यातील नागरिकांना लसीकरण करून घेण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे. सोलापूर जिल्ह्यात ग्रामीण भागात ठिकठिकाणी लसीकरण कॅम्पचे आयोजन केले जात आहे. ग्रामीण भागातील कोरोना परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.
आज दि.28/6/2021 ची सोलापूर जिल्ह्यातील महापालिका क्षेत्र वगळून ग्रामीण व नगरपालिका क्षेत्रातील कोविड-19 ची माहिती सोलापूर जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ शितलकुमार जाधव यांनी सादर केली आहे यामध्ये घरात अलगीकरण, संस्थात्मक अलगीकरण, आयसोलेशन रूग्णांची माहिती, आज प्राप्त झालेले अहवाल, सोलापूर जिल्ह्यातील पाॅझीटीह्व रूग्णांची माहिती, सोलापूर जिल्ह्यातील मयत रूग्णांची माहिती, सोलापूर जिल्ह्यातील कोविड-19 तालुका निहाय माहिती, सोलापूर जिल्ह्यातील कोविड-19 तालुका निहाय गोषवारा अशी एकूण आजच्या दिवसभरातील माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ शितलकुमार जाधव यांनी तालुका वाईज दिली आहे ती पुढील प्रमाणे......


No comments:
Post a Comment