Breaking

Monday, 17 May 2021

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - बहुजन ब्रिगेडची महिला आघाडी बरखास्त, नेते पदही संघटनेत अस्तित्वात नाही...राजेश खरे.


बहुजन ब्रिगेडची महिला आघाडी बरखास्त,नेते पदही संघटनेत अस्तित्वात नाही–राजेश खरे 
 बहुजन ब्रिगेड संघटनेची महिला आघाडी बरखास्त करण्यात आले असल्याचे व बहुजन ब्रिगेड संघटनेत नेते पद अस्तित्वात नसल्याचे प्रसिद्धी पत्रक बहुजन ब्रिगेड संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे यांनी काढले आहे.






बहुजन ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किरण भाऊ साठे व प्रदेशाध्यक्ष दत्ता कर्चे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्यातील सोलापूर, सांगली,सातारा,कोल्हापूर या जिल्ह्यातील महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी यांना पदमुक्त करण्यात येत असून 








आज दिनांक १७/५/२०२१ पासून कोणत्याही महिला आघाडी च्या पदाधिकारी यांनी पदाचा वापर करू नये तसेच बहुजन ब्रिगेड संघटनेमध्ये नेते हे पद अस्तित्वात नसून संघटनेच्या नेते पदाचा वापर कोणी करीत 








असेल तर त्यांचा आणि बहुजन ब्रिगेड संघटनेचा कोणताही संबंध नाही,असे निदर्शनास आल्यास संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.याची नोंद घ्यावी.असे बहुजन ब्रिगेड संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे यांनी काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

No comments:

Post a Comment