कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी/ रेणूताई पोवार - कवठेमहांकाळ तालुक्यात कोरोना गेला हाताबाहेर- याबाबत वृत्त असे की कवठेमंकाळ तालुक्यातील एक वर्षातील कोरोना बाधितांची संख्या पाच हजार 178 पर्यंत पोचली आहे कोरोना मोठ्या प्रमाणात पैलावत आहे.
चालू वर्षातील कोरोना रुग्ण संख्या चिंताजनक आहे सध्या लॉकडाउन डाऊन असूनही कवठेमंकाळ तालुक्यात कोरोना बाधितांची व मृत्यूची वाढती संख्या धोक्याची पातळी गाठली आहे शासकीय आदेशाचे तंतोतंत पालन करून प्रशासनाला सहकार्य करणे आवश्यक आहे.
नागरिकांनी स्वतःची काळजी घेणे महत्त्वाचे आहे कोरोना गेला आहे हाताबाहेर नागरिकांनी पडू नये घराबाहेर असा संदेश प्रशासकीय पातळीवर दिला जात आहे कवठेमंकाळ तालुक्यात चार मे पासून 14 मे अखेर कोरोना बाधित रुग्णांची संख्या विचार करण्यासारखी आहे या दहा दिवसात 1,195 एवढी कोरोणा बाधित रूग्ण संख्या वाढली आहे. व दररोज 100 च्या वर रुग्ण तालुक्यात सापडत आहेत शुक्रवारी तालुक्यात रुग्णसंख्या 183 पर्यंत पोहोचली आहे.
तर 1 जानेवारी 2021 पासून तालुक्यात 77 कोरोना बाधित यांचा मृत्यू झाला आहे यावर्षी आजा अखेर 2 हजार 504 रूग्ण संख्या तालुक्यात आहे 1482 रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत 945 रुग्ण सध्या उपचार घेत आहेत तर 789 कोरोना बाधित रुग्णांना होम आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आली आहे 21 मार्च दोन हजार वीस पासून आज आखेर कवठे महांकाळ तालुक्यातील कोरोना
बाधित रुग्णांची चार हजार 828 पर्यंत संख्या पोचली आहे एक ते दोन दिवसात कवठेमंकाळ तालुक्यातील रुग्णसंख्या पाच हजाराचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे गतवर्षीपासून 3723 रुग्ण बरे झाले आहेत तर आज आखेर कवठेमंकाळ तालुक्यात 158 रुग्णांना जीव गमवावा लागला आहे कोविड सेंटरमध्ये 156 रुग्ण उपचार घेत आहेत कवठेमंकाळ शहरातील व
गावोगावची रुग्ण संख्या व मृत्यू संख्येने धोक्याची पातळी ओलांडली आहे ही आकडेवारी अतिशय चिंताजनक असल्याचे बोलले जात आहे कवठेमंकाळ तालुक्यातील शहरासह गावोगावी कोरोना चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे सर्व कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे कवठेमंकाळ तालुक्यातील कोविड सेंटर मध्ये सुद्धा जागा शिल्लक नाही.
त्यातच रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणावर सापडत असल्याने प्रशासनासमोर प्रश्न उपस्थित होत आहे अशीच रुग्णांची संख्या वाढत राहिली तर रुग्णांवर कसे व कोठे उपचार करायचे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.


No comments:
Post a Comment