संपादक/ कोरोना आजारावर खाजगी रूग्णालयात देखील मोफत उपचार मिळावेत...गणेश घुगे यांची मागणी- याबाबत वृत्त असे की कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे, आणी अशातच सरकारी दवाखान्यात देखील रूग्णांना योग्यवेळी उपचार मिळत नाहीत, म्हणून कोरोना आजारावर खाजगी रूग्णालयात देखील मोफत उपचार मिळावेत.
यासाठी गणेश घुगे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व प्रांताधिकारी कुर्डूवाडी यांना निवेदन दिले आहे. कोरोना आजारावर खाजगी रूग्णालयात देखील समाजातील सर्व उत्पन्न गटातील व्यक्तींना मोफत उपचार मिळावेत अशी त्यांची मागणी आहे.
शासनामार्फत सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटर मध्ये सातत्याने बेडची कमतरता जाणवून येत आहे,
त्यामुळे कोरोना रूग्णांना खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करावे लागते. तसेच सध्या खाजगी रूग्णालयात सदर आजारावरील उपचार हे महागडे असल्याने सर्वांना ते परवडणारे नाहीत, कोणाची परिस्थिती नसते, तर कोणी व्याजाने पैसे आणून उपचार घेत असतात, त्यामुळे उपचार घेण्यासाठी लागणारी रक्कम जवळ नसल्याने व वेळीच उपचार न झाल्याने अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत.
त्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. सध्या लाॅकडाऊनची परिस्थिती असल्याने अनेकांना हाताला काम नाही व त्यामुळे मध्यमवर्गीय व उच्चमध्यम वर्गीय लोक देखील सध्या आर्थिक दृष्ट्या अडचणीत आले आहेत. यामुळे समाजातील सर्व कोरोना बाधित व्यक्तींना खाजगी
रूग्णालयात देखील कोरोना आजारावर मोफत उपचार मिळावेत अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( ए ) चे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख गणेश घुगे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व प्रांताधिकारी कुर्डूवाडी यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.


No comments:
Post a Comment