Breaking

Saturday, 22 May 2021

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी/ रेणूताई पोवार - पोलिसांमधील माणुसकीचे दर्शन.


पोलीसां मधील माणुसकीचे दर्शन 

कोरोना हा महाभयंकर रोग देश भर पसरल्या मुळे प्रशासनाने पुर्ण देश लाॅकडाउन केला तसेच लोकांना ही व लहान मुलांना ही कोरोना पासुन मुक्तता मिळावी या साठी प्रशासनाने काही नियमांचे पालन करण्यास सांगितले होते.









तसेच कोरोना संसर्गजन्य रोग असल्यामुळे हा रोग कुणालाही होऊ शकतो त्यामुळे लोकांना विनाकारण बाहेर फिरु नये साखळी तोडावी यासाठी पोलीस कर्मचारी व ट्राॅफिक कर्मचारी यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता हा बंदोबस्त 
 करताना स्वत:ची पर्वा न करता ,स्वत:च्या जेवनाची पर्वा न  करता, ऊनातान्हात, स्वत:च्या कुंटुबाची पर्वा न करता रात्रंदिवस कोरोना या रोगावरती  मात करण्यासाठी ड्युटी करतात या कोरोना मुळे गेली दिड वर्ष लाॅकडाउन केले आहे तर अशा या लॉकडाउन मध्ये सर्व छोटे मोठे उद्योग धंदे बंद पडले आहेत. 









पोटाची खळगी भरण्यासाठी काही साधनही नव्हते पण कोरोनाला मात करायचे आहे म्हणून हे लॉकडाउन केले होते तर अशा या लॉकडाउनमध्ये 
पोलीस महिला कर्मचारी व ट्राॅफिक महिला कर्मचारी आपले कुटुंब सांभाळून प्रामाणिकपणे ड्युटी  निभावतात तसेच पोलीस कर्मचारी व ट्राॅफिक कर्मचारी आपले कुटुंब सांभाळत ड्युटी निभावत असताना त्यातूनही सामाजिक कार्य करत असतात तर ते सामाजिक कार्य कशा पद्धतीने करतात तर समाजामध्ये आपुलकी, माणुसकी 









 हि कुठेतरी जागृत व्हावी यासाठी आपण समाजाचे काहि तरी देणे आहे हे समजून काहि छोटे मोठे सामाजिक कार्यकर्ते हे चौका चौका तून जे जे पोलीस कर्मचारी ड्युटी करतात त्यांना चहा, पाणी, दुध, बिस्किट, पोहे, खिचडी, मसाले भात, लोणचे, काढा, असे अन्न पुरवतात. तर त्या पोलीस कर्मचारी व ट्राॅफिक कर्मचारी त्यांचे आभार मानतात तसेच पोलीस महिला कर्मचारी व पोलीस कर्मचारी यांनी असा विचार त्यांच्या मनात आला की आम्हाला ड्युटी  करत असताना इथे जाग्यावर पोषन आहार सामाजिक कार्यकर्ते 







आणुन देतात तर या लॉकडाउन मध्ये पोटाचे हाल होतात हे जाणून घेऊन गोर गरिबांच्या कडे कोण लक्ष देणार त्यांच्या पोटाची खळगी कशी भरणार याचा विचार करून स्वत:च्या पोटाची पर्वा न करता आपल्यातला एक घास दुसर्‍यांना देऊन एक हात मदतीचा म्हणुन सामाजिक बांधिलकी म्हणून गोर गरीबांना महिला पोलीस कर्मचारी व पोलीस कर्मचारी गोर गरिबांना पोषन आहार देताना दिसुन आले. 








म्हणतात ना देणार्‍याने देत जावे घेणार्‍याने घेत जावे देणार्‍या पेक्षा घेणार्‍याच्या चेहर्‍यावर आनंद जास्त दिसून येतो आणी हाच खरा आनंद पाहून पोलीस कर्मचारी यांच्या सदैव पाठिशी आशीर्वाद राहतो पोलीस महिला कर्मचारी व पोलीस कर्मचारी, ट्राॅफिक कर्मचारी यांची हिच खरी संपत्ती होय तरी लोकांना हे सर्व दृश्य पाहून लोकांनी प्रशासनाला समजावून नियमांचे पालन करावे.








हे दृश्य पाहून गोरगरिबांना सहकार्य करणारे
पोलीस महिला कर्मचारी 
सौ. रेश्मा शेटके (मॅडम )
सौ. पी. पी.काबंळे ( मॅडम )
पोलीस कर्मचारी 
श्री. आर. डि पुजारी (साहेब )
श्री. सुरेश परीट (साहेब )इतर सर्व  पोलीस कर्मचारी, ट्राॅफिक कर्मचारी 
 हे उपस्थित होते.
व अशा तरेने आपली ड्युटी  प्रामाणिक पणे निभावत असताना दिसुन येतात.
महिला पोलीस कर्मचारी व पोलीस कर्मचारी यांना प्रतिनिधी सौ. रेणुताई पोवार यांच्या कडुन कोटी कोटी प्रणाम.

No comments:

Post a Comment