मोहोळ शहर प्रतिनिधी/ सुनिल गायकवाड - दि. 22/5/2021 ची सोलापूर जिल्ह्यातील महापालिका क्षेत्र वगळून ग्रामीण व नगरपालिका क्षेत्रातील कोविड-19 ची माहिती- याबाबत वृत्त असे की सोलापूर जिल्ह्यात सध्या दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे.
व याचा परिणाम ग्रामीण भागावरती जास्त प्रमाणात झालेला दिसून येतो, अशातच सोलापूर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा ध्येयाने आणि कामाला लागलेली दिसून येत आहे ग्रामीण व शहरी भागाची तुलना केली असता शहरी भागात कोरोना आटोक्यात आला असून ग्रामीण भागात मात्र दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत आहे ग्रामीण भागातील नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे असे आव्हान सोलापूर जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर शीतल कुमार जाधव यांनी केले आहे सोलापूर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा कार्यक्षम असून डॉक्टर शीतल कुमार जाधव हे सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना प्रसिद्धीपत्रकाद्वारे वारंवार सूचना करत आहेत.
सोशल डिस्टन्स पाळा गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा मास्क व सॅनिटायझर चा वापर करा , बाहेरून आल्यानंतर आपले हात पाय स्वच्छ धुवूनच घरात प्रवेश करावा लहान मुलांची तसेच वृद्धांची काळजी घ्यावी असे आवाहन सोलापूर जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने वारंवार करण्यात येत आहे तरीपण ग्रामीण भागातील नागरिक हे काळजी घेत नसून वारंवार विनाकारण बाहेर पडत आहेत नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य केले पाहिजे.
शासनाच्या नियमांचे पालन केले पाहिजे तरच कोरोना आटोक्यात येईल सोलापूर जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा रात्रीचा दिवस करून कोरोना बाधितांवर उपचार करीत आहे, तसेच सोलापूर जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर शीतल कुमार जाधव यांनी दिनांक22/5/2021 ची सोलापूर जिल्ह्यातील महापालिका क्षेत्र वगळून ग्रामीण व
नगरपालिका क्षेत्रातील कोविड-19 ची माहिती सादर केली आहे यामध्ये घरात अलगीकरण, संस्थात्मक अलगीकरण, आयसोलेशन रूग्णांची माहिती, आज प्राप्त झालेले अहवाल, सोलापूर जिल्ह्यातील पाॅझीटीह्व रूग्णांची माहिती, सोलापूर जिल्ह्यातील मयत झालेल्या व्यक्तींची माहिती,
सोलापूर जिल्ह्यातील कोविड-19 तालुका निहाय माहिती, सोलापूर जिल्ह्यातील कोविड-19 तालुका निहाय गोषवारा अशी एकूण आजच्या दिवसभरातील माहिती, तालुका वाईज सोलापूर जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ शितलकुमार जाधव यांनी सादर केली आहे ती पुढील प्रमाणे......


No comments:
Post a Comment