कराड येथील स्व.सौ.वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांची खाण्यापिण्याची गैरसोय होऊ नये म्हणून रोटरी क्लब ऑफ कराड चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या "मोफत अन्नदान उपक्रमांतर्गत" येथील आंतररूग्ण विभागात उपचार घेत असलेल्या नातेवाईकांना मोफत अन्न देण्यात येणार आहे.
या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
याप्रसंगी नामदार बाळासाहेब पाटील,कराड नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते सौरभ पाटील, जयंत बेडेकर, तहसीलदार अमरदीप वाकडे, रोटरी क्लब ऑफ कराड चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव डॉ.राहुल फासे, प्रोजेक्ट चेअरमन प्रबोध पुरोहित, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रकाश शिंदे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
या रुग्णालयात तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून रुग्ण येतात, परंतु त्यांच्यासोबत येणाऱ्या नातेवाईकांची खाण्यापिण्याची मोठी गैरसोय होते. हि गैरसोय टाळण्यासाठी रोटरी क्लब ऑफ कराड यांनी केलेला समाजोपयोगी उपक्रम सुरू केला आहे. त्यांची हि सेवा अनेकांना संकटाच्या काळात दिलासा देणारी ठरणार आहे. सध्या शहरातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता त्यांनी घेतलेल्या या निर्णय अत्यंत स्तुत्य आहे.


No comments:
Post a Comment