Breaking

Sunday, 16 May 2021

सातारा जिल्हा प्रतिनिधी/ मारूती सोमुत्ते - कराड येथील कृष्णा नदीवरील नवीन बांधकाम सुरू असलेल्या पुलाची मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केली पाहणी.


आज कराड येथील कृष्णा नदीवरील नवीन बांधकाम सुरू असलेल्या पुलाची मंत्री बाळासाहेब पाटील यांनी पाहणी केली.

याप्रसंगी  मंत्री बाळासाहेब  पाटील ,गंगाधर जाधव, राष्ट्रीय महामार्ग विभाग कोल्हापूरचे शाखा अभियंता निखिल पानसरे, कन्सल्टंट रेसिडीयन इंजिनिअर वाणी,  स्ट्रक्चरल इंजिनिअर जावेद, ठेकेदार राजपथ इन्फ्रा पुणे यांचे प्रोजेक्ट मॅनेजर कुलकर्णी, पोकरकर व धुमाळ उपस्थित होते.








गुहागर -विजापूर रस्त्यावरील कराड येथील कृष्णा नदीवरील नवीन पुलाचे काम बरेच दिवस रखडले होते, मध्यंतरी पावसामुळे काही अडचनी येत असल्याने थोडा उशीर झाला, परंतू आता हे काम अंतिम टप्प्यात आले असून दोन्ही बाजूच्या पोहच रस्त्याचे काम लवकररात लवकर सुरु करावे आशा सूचना पाटील यांनी केल्या.







शेजारच्या नवीन पुलावरून दुहेरी वाहतूक  असल्याने दळणवळणामध्ये अडचणी निर्माण होत आहेत, नवीन बांधकाम सुरू असलेल्या पुलाचे काम पूर्ण झाल्यांनातर दळणवळण सुलभ होणार असून या नवीन उंच पुलामुळे कराड शहराच्या वैभवात भर पडणार आहे. 







तसेच नवीन पुलाच्या दोन्ही बाजूचे जोडरस्ते, उत्तरेकडील बाजूस कॅनॉलवरील पुलाच्या लेव्हलला व दक्षिणेकडील बाजूस डॉ.एरम हॉस्पिटलच्या समोरील रस्त्याच्या लेव्हलला उचलुन घेण्याच्या सूचना बाळासाहेब पाटील यांनी  संबंधितांना दिल्या.




No comments:

Post a Comment