Breaking

Sunday, 2 May 2021

भोसरे प्रतिनिधी/ अमोल हावळे - सोलापूर जिल्ह्याला रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा होण्याबाबत डी उद्योग समूहाचे स्वप्निल जानराव यांचे मुख्यमंत्री साहेबांना निवेदन.


डी उद्योग समूह चे अध्यक्ष स्वप्निल संदेश जानराव(लउळ) तालुका माढा   यांनी सोलापूर जिल्हास रेमडीसिविर इंजेक्शन चा पुरवठा जास्त करण्याची मागणी केली आहे. वरील विषयास अनुसरून विनंती करतो की सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाचा उद्रेक जास्त प्रमाणात झाला आहे कोरोना पाॅझीटीह्व रूग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा  मृत्यू दर हि जास्त आहे सोलापूर जिल्ह्यात रेमडीसिविर इंजेक्शन कमी प्रमाणात मिळत असल्याने उपचार करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. उपचारासाठी 5453 इंजेक्शन मिळालेत हे प्रमाण 29॰७३%आहे.  सोलापूर जिल्ह्य़ा तिल रूग्णांचा विचार करता इंजेक्शन चे प्रमाण कमी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  साहेब महाराष्ट्र राज्य  यांनी त्वरित रेमडीसिविर   इंजेक्शन उपलब्ध करण्यासाठी आरोग्य अधिकारी यांना आदेश  द्यावा. हि मागणी डी उद्योग समूहा चे अध्यक्ष जानराव साहेब यांनी शासनाला केली आहे.

No comments:

Post a Comment