सोलापूर जिल्ह्यातील आंदोलनकर्त्या सत्ताधाऱ्यांनो... शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तुम्हाला जरातरी आब्रुची चाड असेल तर अगोदर आपापल्या पक्षाचे राजीनामे द्या आणि नंतर सरकारच्या धोरणात्मक निर्णया विरोधात आंदोलने करा...! सरकार तुमचे, मुख्यमंत्री तुमचा, उजनीचे ५ टिएमसी पाणी इंदापूर तालुक्यातील २२ गावांना देण्याच्या धोरणात्मक निर्णयावर मुख्यमंत्री मा. उध्दवजी ठाकरे यांची सही...
आणि सत्ता भोगणारे सोलापूर जिल्ह्यातील कारभारी मात्र सरकारला व पालमंत्र्यांना दोष देवून याप्रश्नावर आंदोलने करताहेत? उजनी धरणाच्या पाणी वाटप नियोजनात सध्या पाणीच शिल्लक नसताना महाविकास आघाडी सरकारने इंदापूर तालुक्यातील २२ गावांना पाणी देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतलाच कसा? उजनी धरणातील सोलापूर
जिल्ह्याच्या वाट्याचे ५ टिएमसी पाणी इंदापूर तालुक्याला पळविण्याच्या चुकीच्या धोरणात्मक निर्णया बाबतीत पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे एकटेच जबाबदार नसून महाविकास आघाडी सरकार मधील सर्व घटक पक्ष यास सर्वस्वी जबाबदार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमधील सोलापूर जिल्ह्याच्या सत्ताधाऱ्यांनो अगोदर आपापल्या पक्षाचे राजीनामे द्या... आणि मग या प्रकरणी आंदोलन करा. नाहीतर चोरांच्या उलट्या बोंबा... असा प्रत्यय जनतेला आल्यावाचून राहणार नाही. भावांनो, जनतेला वेढ्यात काढायचे दिवस आता संपलेत!
या प्रकरणी महाविकास आघाडी सरकारने सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अन्यायकारक लादलेला निर्णय त्वरीत रद्द बातल करावा... अन्यथा भारतीय जनता पार्टी चे वतीने तिव्र जनआंदोलन करण्यात येणार असल्याचे पक्ष नेतृत्वाने सुचीत केले आहे.
(संजीव खिलारे, प्रदेश सचिव-भाजपा, अ. जा. मोर्चा महाराष्ट्र)
No comments:
Post a Comment