Breaking

Sunday, 2 May 2021

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - आमदार निधीच्या सहाय्याने कोरोना रूग्णांसाठी बार्शीत उभारणार 55 आॅक्सीजन बेडचे डेडिकेटेड कोव्हिड हाॅस्पीटल...आ.राजेंद्र राऊत.


*आमदार निधीच्या सहाय्याने कोरोना रूग्णांसाठी बार्शीत उभारणार 55 ऑक्सिजन बेडचे डेडिकेटेड कोवीड हॉस्पिटल, तसेच बार्शी नगरपरिषदेस घेणार नवीन रुग्णवाहिका, ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना 28 लाखांचा निधी -- आमदार राजेंद्र राऊत* 

*कोरोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे बार्शी शहर व तालुक्यातील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या कोरोना बाधीत रुग्णांसाठी आमदार राजेंद्र राऊत यांनी एक कोटी रुपयांचा आमदार निधी जाहीर केला आहे.*








*आमदारांच्या स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत सन 2021 च्या आमदार निधीतून बार्शी शहरातील ग्रामीण रुग्णालया शेजारील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह या ठिकाणी 55 बेडचे डी.सी. एच.सी. ( डेडिकेटेड कोवीड हॉस्पिटल ) उभारण्यासाठी आवश्यक असलेल्या उपचारांसाठी सर्व साधनांकरिता 50 लाख रुपयांचा निधी,  तसेच ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रे वैरागसाठी 10 लाख रुपये, आगळगाव, पानगाव, चिखर्डे ,उपळे (दु), गौडगाव, यांकरिता प्रत्येकी 2 लाख रुपये, तडवळे करिता 1 लाख रुपये, पांगरी ग्रामीण रुग्णालया करिता 5 लाख रुपये, बार्शी शहर एक व दोन यासाठी प्रत्येकी 1 लाख रुपये, त्याचप्रमाणे बार्शी नगरपरिषदेस एक नवीन रुग्णवाहिका घेण्यासाठी 22 लाख रुपयांचा निधी देत असल्याचे आमदार राजेंद्र राऊत यांनी सांगितले. याबाबत त्यांनी मा.जिल्हा नियोजन अधिकारी यांच्याकडे पत्र दिले आहे.*

No comments:

Post a Comment