नमस्कार,
*अडिच हजारांहून अधिक जावयांचा जबाबदार सासरा.. लोकमंगल परिवाराचा कारभारी.. पक्षाने आदेश दिल्यास कुठूनही, कोणाच्याही विरोधात झुंजायला लंगोट लावून सज्ज राहणारा लढवय्या राजकारणी.. संकट असो वा विजयोत्सव पोटातील पाणीही हलू न देणारा कणखर बाणा.. त्यांच्या अशा अनेक गुणवैशिष्ट्यांची खूप खूप मोठी मालिका गुंफावी लागते...
होय,आपण आपल्या सुभाषबापूंबद्दलच बोलतोय! त्यांच्यातील चिक्कार गुणांपैकी सकारात्मकता,उपक्रमशिलता आणि काळाचा सतत वेध घेणारा विधायक दृष्टिकोन,हे त्यांचे गूण मला आणि माझ्या सारख्या अनेकांना विशेष भावतात.
त्यांच्यातील त्याच गुणांनी सोलापूर सोशल फाउंडेशन हा राजकारणा पलिकडचा उपक्रम जन्मी घातला..आज त्याच उपक्रमाचा तिसरा वर्धापन दिन.. म्हणूनच माजी सहकार मंत्री,भाजपाचा महाराष्ट्रातील मराठा चेहरा ,द.सोलापूरचे विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांचे अभिनंदन, शुभेच्छा आणि मनापासूनची तहहयात अपेक्षा..असेच लगे रहो बापू!*
*रमजान ईद आणि अक्षय त्रितीयेच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!*
*-राजा माने,*
-अध्यक्ष, डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र
-संस्थापक संचालक, मातृभूमी प्रतिष्ठान, बार्शी.
No comments:
Post a Comment