“…तर मास्क घालण्याची गरज नाही,”
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची मोठी घोषणा........
करोनाचा सामना करण्यासाठी सध्या अनेक देशांनी मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम हाती घेतली आहे.
करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या अमेरिकेतही लसीकरण मोहीम सुरु असून यादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी मोठी घोषणा केली आहे.
लसीकरण पूर्ण झालं असेल त्यांनी आता मास्क घालण्याची आवश्यकता नसल्याचं जो बायडन यांनी सांगितलं आहे.
रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राकडून (सी.डी.सी.) यासंबंधी मार्गदर्शक तत्वं जाहीर करण्यात आली असून त्याचा उल्लेख करत त्यांनी ही माहिती दिली. सी.डी.सी.ने नव्याने मार्गदर्शक तत्वं जाहीर केली असून लसीकरण पूर्ण झालेल्यांनी मास्क घालण्याची गरज नसल्याचं सांगितलं आहे.
मात्र यावेळी त्यांनी ज्यांचं अद्यापही लसीकरण झालेलं नाही त्यांनी अंतिम टप्पा गाठेपर्यंत आपली सुरक्षा करणं गरजेचं असल्याचंही नमूद केलं आहे.
व्हाईट हाऊसमध्ये बोलताना बायडन यांनी सांगितलं की, “काही तासांपूर्वीच सी.डीसी.ने आपण पूर्ण लसीकरण केलेल्या लोकांना आता मास्क घालण्याची गरज नसल्याची शिफारस केली आहे.
ही शिफारस खरी असून घरात किवा घराबाहेर दोन्हीकडे लागू आहे.
मला वाटतं हा मोलाचा टप्पा आहे.
एक मोठा दिवस असून नागरिकांचं लवकरात लवकर लसीकरण केल्यानेच हे यश संपादन करणं शक्य झालं आहे”.
“गेल्या १४४ दिवसांपासून आपण लसीकरण करत असून जगाचं नेतृत्व केलं आहे.
संशोधक, शास्त्रज्ञ, औषध कंपन्या, लष्कर, फेमा, डॉक्टर्स, परिचारिका, द नॅशनल गार्ड, गव्हर्नर अशा अनेकांच्या मेहनतीमुळे हे शक्य झालं आहे.
No comments:
Post a Comment