Breaking

Friday, 14 May 2021

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर- मंगळवेढ्यात पालकमंत्र्यांच्या पुतळ्यासमोर खर्डा भाकर आंदोलन.


मंगळवेढ्यामध्ये पालकमंत्र्यांच्या पुतळ्यासमोर 'खर्डा-भाकर' आंदोलन

* लढा तीव्र करणार; ॲड. बापु मेटकरींचा इशारा





सोलापूर जिल्ह्यातील सिंचनाच्या योजनांसाठी पैसा नाही म्हणून चालढकल करणाऱ्या बारामतीकरांकडे इंदापूर सिंचन साठी पैसा कुठून आला..? वास्तविक पाहता जुन्या सिंचन योजना पूर्ण करून नवीन सिंचन योजनांसाठी निधी उपलब्ध करण्याचा नियम आहे. मात्र मोहोळ, बार्शी, अक्कलकोट, सांगोला, दक्षिण, मंगळवेढा या तालुक्यांमधील सिंचन योजना अर्धवट असताना देखील फक्त बारामती मतदारसंघ सुस्थितीत रहावा या कपटी हेतूने सोलापूरचे पाणी इंदापूरला वळविण्याचा घाट या लोकांनी बांधला आहे. तो आम्ही कधीच यशस्वी होऊ देणार नाही. त्यासाठी यापेक्षा लढा आणखीन तीव्र करू असा इशारा उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीचे उपाध्यक्ष ॲड. बापू मिटकरी यांनी दिला.











हुन्नूर (ता. मंगळवेढा) येथे उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समिती व मंगळवेढा 35 गाव पाणी संघर्ष समिती यांची संयुक्त बैठक आयोजित केली होती या बैठकीला 35 गावातील लोकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन उजनी धरण बचाव संघर्ष समितीला एकमुखाने पाठिंबा दिला. व पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पुतळ्यासमोर खर्डा भाकर खावुन निषेध नोंदविण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी अध्यक्ष अतुल खुपसे-पाटील, सचिव माऊली हळणवर, 








कार्याध्यक्ष सुहास घोडके, दिपक भोसले, दिपक वाडदेकर, 

सहसचिव किरण भांगे, संघटक माऊली जवळेकर, सरचिटणीस आण्णा जाधव, खजिनदार अभिजित पाटील, प्रवक्ता चिमणदादा साठे, सदस्य धनाजी गडदे, विठ्ठल मस्के, रुक्मिणी दोलतडे,बळीराम गायकवाड, आप्पासाहेब गवळी आदी उपस्थित होते.









यावेळी बोलताना दीपक वाडदेकर म्हणाले की, उजनी जलाशय मध्ये फक्त सोलापूरकरांचा अधिकार आहे. उजनी जलाशयातील शंभर टक्के पाण्याचे वाटप नियोजन झालेले आहे. असे असताना लायकीप्रमाणे सांडपाणी हा शब्द वापरून बारामतीकरांनी सुरु केलेले घाणेरडे धंदे बंद करावे. 








उजनी मध्ये येणारे पाणी हे आमचे आहे, शेतकऱ्यांच्या हक्काचे आहे. उजनी मध्ये कोणत्याही प्रकारचे सांडपाणी येत नसल्याचा अहवाल पुणे महापालिकेने दिला आहे. शिवाय परवा प्रा. शिवाजी बंडगर यांनी वस्तुस्थिती दर्शवणारा व्हिडिओ समाज माध्यमावर शेअर केलेला आहे. त्यामुळे अशी तफावत असताना येणारे पाणी आम्ही उचलतोय असावा कांगावा बारामतीकर कशासाठी करत आहेत असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.










यावेळी

, मेजर बिराप्पा दोलतडे, आप्पासाहेब मेटकरी, यल्लाप्पा पडवळे, भागवत सुमते, संतोष मेटकरी, संतोष मेटकरी, नवनाथ पुजारी, विनायक पुजारी, शामराव रेवे, यशवंत बीचुकले, देवा पुजारी, ओंकार पडवळे, राहुल शिंदे, महादेव शिंदे, वसंत अमनगे, समाधान मेटकरी, आनंदा पुजारी, देवाप्पा पुजारी, दत्ता काळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.








बारामतीकरांना याची किंमत मोजावी लागेल

: देशाचे नेते शरद पवार यांनी सोलापूर जिल्ह्यावर मनापासून प्रेम केलं आहे सोलापूरकरांनी देखील आदरणीय पवार साहेबांवर ठीण काळात प्रेम करून मनापासून साथ दिलेली आहे त्यामुळे सोलापूर जिल्ह्या वर बारामतीकर अन्याय करत असतील तर येणार्‍या काळात बारामतीकरांना आमचे पाच टीएमसी पाणी घेतल्याबद्दल मोठी किंमत मोजावी लागेल.


किरण भांगे 

सहसचिव, उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समिती 

No comments:

Post a Comment