Breaking

Tuesday, 25 May 2021

मोहोळ तालुका प्रतिनिधी/ संभाजी वागज- मौजे ढेकळेवाडी येथे लसीकरणास सुरूवात, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मागणीला यश.


मोहोळ तालुका प्रतिनिधी/ संभाजी वागज - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मागणीला यश, ढेकळेवाडीत लसीकरणास सुरूवात- याबाबत वृत्त असे की सध्या सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. आणी या प्रादुर्भावापासून नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी सरकारने लसीकरणास सुरूवात केली आहे, मोहोळ तालुक्यातील मौजे ढेकळेवाडी येथील मोहोळ तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष महादेव मांढरे यांनी मौजे ढेकळेवाडी येथे तात्काळ लसीकरण कॅम्प सुरू करण्याची मोहोळ तालुक्याचे तहसीलदार सो यांना निवेदन दिले होते, त्यांच्या या मागणीला यश आले आहे मोहोळ तालुक्यातील ढेकळेवाडीत 45 वया पेक्षा जास्त वय असणार्यांची संख्या जवळपास 653 इतकी आहे, तसेच बीपी, मधुमेह, दमा असणार्यांची संख्या 37 इतकी आहे. मौजे ढेकळेवाडी ( बैरागवाडी) हे गाव मोहोळ तालुक्यातील शेवटचे टोक आहे. त्यामुळे या गावातील नागरिकांना लस घेण्यासाठी अनगर हे सेंटर आहे. हे सेंटर गावापासून दूर आहे त्यामुळे वयस्कर लोकांना तेथे जाण्यासाठी अडचणीचे ठरत आहे. काही वेळा तेथे लस उपलब्ध नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. तरी ढेकळेवाडी ( बैरागवाडी) येथे तात्काळ लसीकरण कॅम्पचे आयोजन करण्यात यावे अशी मागणी महादेव मांढरे यांनी मोहोळ चे तहसीलदार सो यांना निवेदनाव्दारे केली होती. तरी त्यांच्या या मागणीला यश आले आहे व मौजे ढेकळेवाडी येथे प्रशासनाने 50 लस उपलब्ध करून देण्यात आल्या यासाठी ढेकळेवाडीचे उपसरपंच नाना ढेकळे, माजी सरपंच राजाभाऊ ढेकळे, मनसेचे शेतकरी सेना मोहोळ तालुका अध्यक्ष महादेव मांढरे, संजय सलगर, बापू व्यवहारे यांनी प्रयत्न केले. 








  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मागणीला यश, ढेकळेवाडीत लसीकरणास सुरूवात- याबाबत वृत्त असे की सध्या सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. आणी या प्रादुर्भावापासून नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी सरकारने लसीकरणास सुरूवात केली आहे, मोहोळ तालुक्यातील मौजे ढेकळेवाडी येथील मोहोळ तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष महादेव मांढरे यांनी मौजे ढेकळेवाडी येथे तात्काळ लसीकरण कॅम्प सुरू करण्याची मोहोळ तालुक्याचे तहसीलदार सो यांना निवेदन दिले होते, त्यांच्या या मागणीला यश आले आहे मोहोळ तालुक्यातील ढेकळेवाडीत 45 वया पेक्षा जास्त वय असणार्यांची संख्या जवळपास 653 इतकी आहे, तसेच बीपी, मधुमेह, दमा असणार्यांची संख्या 37 इतकी आहे. मौजे ढेकळेवाडी ( बैरागवाडी) हे गाव मोहोळ तालुक्यातील शेवटचे टोक आहे. त्यामुळे या गावातील नागरिकांना लस घेण्यासाठी अनगर हे सेंटर आहे. हे सेंटर गावापासून दूर आहे त्यामुळे वयस्कर लोकांना तेथे जाण्यासाठी अडचणीचे ठरत आहे. काही वेळा तेथे लस उपलब्ध नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. तरी ढेकळेवाडी ( बैरागवाडी) येथे तात्काळ लसीकरण कॅम्पचे आयोजन करण्यात यावे अशी मागणी महादेव मांढरे यांनी मोहोळ चे तहसीलदार सो यांना निवेदनाव्दारे केली होती. तरी त्यांच्या या मागणीला यश आले आहे व मौजे ढेकळेवाडी येथे प्रशासनाने 50 लस उपलब्ध करून देण्यात आल्या यासाठी ढेकळेवाडीचे उपसरपंच नाना ढेकळे, माजी सरपंच राजाभाऊ ढेकळे, मनसेचे शेतकरी सेना मोहोळ तालुका अध्यक्ष महादेव मांढरे, संजय सलगर, बापू व्यवहारे यांनी प्रयत्न केले.

No comments:

Post a Comment