*महाराष्ट्र विकास विद्यार्थी आघाडी माढा तालुका अध्यक्ष जमीर सय्यद यांनी उजनी पाणी वाटपाचा निषेध करून अतुलभाऊ खुपसे-पाटील यांच्या प्रतिमेला दुग्धभिषेक करून प्रतिमा केली पवित्र*
*
पांढरेवाडी गावातील दत्त मंदिरात इंदापूर च्या पाणी वाटपाच्या निर्णयाचा महाराष्ट्र विकास विद्यार्थी आघाडी माढा तालुका अध्यक्ष जमीर सय्यद यांनी केला निषेध"""!
इंदापूर येथील काही स्वयंघोषित भरणे
मामाच्या समर्थकांनी अतुलभाऊ खुपसे यांच्या प्रतिमेस चप्पल जोडे मारल्याची घटना कानावर आली आणि त्या अकलेच्या कांद्याच्या बुद्धीची कीव वाटली, त्याला प्रति उत्तर म्हणून माढा तालुक्यातील उंदरगाव गावच्या शेतकरी पुत्रांनी अतुल खूपसे यांच्या प्रतिमेला दही दुधाचा अभिषेक घालून त्यांना पवित्र केले;
उजनी धरणाची निर्मिती होऊन आज जवळपास पंचावन्न वर्षे झाली, या उजनी धरणाची 117 tmc ची पाणी धरून ठेवण्याची क्षमता आहे, मागील 50 वर्षात या धरणाचे पाणी कोण कोणत्या तालुक्यासाठी जाणार आहे याचं पूर्ण नियोजन पूर्वीच ठरलेलं आहे, पूर्ण117 tmc चं वाटप या पूर्वीच झालं आहे, ज्यांना मागील दहा वर्षात एक फोन tmc चं वाटप झालं आहे त्यांना अजूनही पाणी मिळालं नाही, त्यात मग मंगळवेढा 35 गावाचा पाणी प्रश्न असेन,सांगोला उपसा सिंचन असेल किंवा बार्शी ची योजना असेल,पाणी मंजूर होऊन ही यांना पाणी मिळालं नाही, आज दहा वर्षे झालं नवीन योजनांना फक्त गाजर दाखवलं आहे, आणि कोणतेच आदेश आणि तरतूद नसताना हे इंदापुरकरांना या राष्ट्रवादी सरकार ने अजून एक मोठं गाजर म्हणा की लॉली पॉप म्हणा असलं काही तरी दिलं आहे,
मित्रहो, आहे त्यांनाच पाणी मिळत नाही,110%धरण भरूनही मंजूर पाण्याची आवर्तने सुटू शकली नाहीत, तीन तीन पाळ्या मंजूर असलेल्या भीमा नदीला आणि उजव्या कालव्याला एक पाळी अजूनही नीटनेटकी मिळाली नाही, आणि त्यात अजून एक लॉलीपॉप, या लोकांची ही फक्त गाजरं आहेत, मतदारसंघ सेफ करण्यासाठी हा अट्टाहास आहे, मागील तीन निवडणूका या पाणी प्रश्नावर येथील लोकप्रतिनिधी लढवून निवडून जात आहेत, मागील पन्नास वर्षात या काँग्रेस व राष्ट्रवादी ची कितीतरी वेळा सत्ता आली, अर्थमंत्री यांचे, मुख्यमंत्री यांचे पाठबंधारे मंत्री सुद्धा यांचेच, तरीही आजपर्यंत हे ज्यांना आश्वासने दिली आहेत त्यांना न्याय का देऊ शकले नाहीत...!!
आणि आज इंदापूर आणि सोलापूर मध्ये तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी टाकून हे मोकळे झाले आहेत...!!
यातून निष्पन्न काहीच होणार नाही, फक्त दोन जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांमध्ये दरी निर्माण होईल..!!
म्हणून राजकारण्यांचे राजकारण ओळखा आणि सावध भूमिका घ्या..!!
एकच निर्धार उजनी सोलापूर करांचा आधार""''!💪
शेतकरी पुत्र अतुल खुपसे-पाटील यांना बदनाम करण्याच्या कटकारस्थानाचा जाहीर निषेध
No comments:
Post a Comment