Breaking

Saturday, 1 May 2021

पश्चिम महाराष्ट्र प्रतिनिधी/ सचिन खंदारे- यंदा उन्हाळा सुट्टी 1 मे ते 13 जून 2021 पर्यंत...राज्याचे शिक्षण संचालकांचे आदेश.


पश्चिम महाराष्ट्र प्रतिनिधी/ सचिन खंदारे-उन्हाळा सुट्टी दिनांक 1 मे ते 13 जून 2021 पर्यंत राज्याचे मा.शिक्षण संचालकांचे आदेश - याबाबत वृत्त असे की राज्यातील यंदाची उन्हाळा सुट्टी दिनांक 1 मे ते 13 जून 2021 पर्यंत देण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण संचालक यांनी नुकतेच आदेश काढले आहेत राज्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या सन 2021- 22 उन्हाळ्याची व दिवाळीची सुट्टी याबाबत सुसूत्रता रहावी म्हणून शिक्षण संचालकांच्या वतीने दरवर्षी शैक्षणिक वर्षातील सुट्ट्यांची निश्चिती करण्यात येते त्यानुसार सुट्ट्या बाबत जिल्ह्यातील सर्व मान्यताप्राप्त शासकीय अशासकीय प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय व सैनिकी शाळा यांच्यासाठी एक मे 2021 पासून उन्हाळी सुट्टी लागू करणेबाबत नुकतेच आदेश काढले आहेत ही सुट्टी एक मे 2021 ते 13 जून 2021 पर्यंत देण्यात येणार आहे व पुढील दोन हजार 21 ते 22 या शैक्षणिक वर्षाकरिता 14 जून रोजी शाळा सुरू करण्यात याव्यात असेही आदेश  काढण्यात आले आहेत तसेच विदर्भातील शाळा हा तेथील तापमानाचा विचार लक्षात घेता येथील शाळा उन्हाळी सुट्टीनंतर 28 जून 2021 रोजी सुरू होतील असे या आदेशात म्हटले आहे, सध्या राज्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी म्हणून राज्यातील सर्व महानगरपालिका तसेच नगरपालिका व सर्व नगरपंचायत क्षेत्रातील सरकारी व खाजगी प्राथमिक माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय हे सध्या बंद आहेत सन 2021-2022 या शैक्षणिक वर्षात शाळा सुरू करण्यासाठी कोविड-19 ची तत्कालीन परिस्थिती विचारात घेऊन शासन स्तरावर वेळोवेळी जे आदेश दिले जातील ते यथावकाश संचालनालयाकडून निर्गमित केले जातील असे शिक्षण संचालक यांनी परिपत्रकात म्हंटले आहे.

No comments:

Post a Comment