भोसरे प्रतिनिधी /अमोल हावळे - कोरोना काळात रिक्षा चालकांना आर्थिक अनुदान मिळण्याबाबत निवेदन- याबाबत वृत्त असे की
कोविड-19 च्या काळात रिक्षा चालकांना आर्थिक सानुग्रह अनुदान मिळण्याबाबत निवेदन देण्यात आले, कोविड-19 काळात लाॅकडाऊनची परिस्थिती असल्याने व्यवसाय बंद आहेत रिक्षा चालकांनी बँकेचे कर्ज घेऊन रिक्षा घेतल्या आहेत. बॅकेचे हफ्ते द्यायचे कुठून,
बाजारपेठा बंद असल्याने रिक्षा वाहनाला ग्राहक मिळत नाहीत. रिक्षाचा व्यवसाय दिवसाला 40 रूपये होने मुश्किल झाले आहे. रिक्षा चालकावर उपासमारी चि वेळ आली आहे. कुर्डूवाडी रिक्षा चालक संघटना यांनी शासनास विनंती केली आहे . आर्थिक सानुग्रह मदत करावी.
हि मागणी उपविभागीय दंड अधिकार साहेब कुर्डूवाडी यांना ईमेल द्वारे केली आहे. यावेळी रिक्षा चालक अझरुद्दीन मुलाणी, संतोष अढवळकर, आकाश अस्वरे, सत्तार शेख, शाहरुख मुलाणी, निहाल शेख उपस्थित होते.
No comments:
Post a Comment