*🪔प्रफुल्ल शेंडगे...🪔*
*अत्यन्त धक्कादायक समाचार प्रफुल्ल आपल्यातून निघून गेले..प्रफुल्ल हे नावाप्रमाणेच प्रफुल्लित असे व्यक्तिमत्त्व होते...ढोलकीच्या तालात ते बेधुंदपणे तल्लीन होऊन रममाण व्हायचे सतत चेहऱ्यावर हास्य फुलवीत ते कार्यक्रमात रंगत आणायचे समाधानी वृत्ती प्रत्येकावर नितांत प्रेम करणारे असे हे प्रफुल्ल शेंडगे निघून गेलेत तेही खूपच कमी आयुष्यात हे पटत नाही पण नियती अखेर कठोर असते हेच पुन्हा प्रत्ययाला आले आपण नियतीपुढे हतबल आहोत पण खुप वेदना होत आहे आमच्या हृदयस्पर्श च्या अनेक कार्यक्रमात प्रफुल्ल शेंडगे यांनी संगत केलेली होती.
कार्यक्रम रंगतदार करण्यासाठी प्रफुल्ल यांचा उत्साह वाखावणारा असायचा प्रत्येक गीत सादर करताना त्यांचा हसमुख मूड ह्यांमुळे ते गीत दणक्यात सादर केले जायचे.... हा प्रफुल्लित चेहरा आणि त्यामागील एक जातीवन्त कलाकार यापुढे कार्यक्रमात दिसणार नाही याचे सलं मात्र कायमचे आणि निरंतर बोचत राहणार आहे... एक मनस्वी उत्साही आणि तरुण उमदा असा हा चतुरस्त्र बहुरंगी तबला बोंगो ढोलकी सम्राट प्रफुल्ल आपल्याला चटका लावून गेलेला आहे हे वास्तव स्वीकारायला मन धजवत नाही पण हे स्वीकारण्याची हिम्मत करावीच लागेल मी व्यक्तिगत आणि आमच्या हृदयस्पर्श सोशल अँड कल्चरल फौंडेशन च्या वतीने भावभिनय भावपूर्ण अश्रूंपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो... पदमाकर कापसे.. आणि हृदयस्पर्ष सांगीतिक परिवार...💐💐💐💐💐💐💐💐💐💐*
No comments:
Post a Comment