सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - इंदापूरला नेण्यात आलेल्या 5 टीएमसी पाण्याचा आदेश त्वरीत रद्द न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा शिवाजीराजे कांबळे यांचा इशारा- याबाबत वृत्त असे की उजनी जलाशयातील सांडपाण्याच्या जिवावरती शासनाने इंदापूर तालुक्याला 5 टीएमसी पाणी देण्याचा दुर्दैवी निर्णय घेतला असून तो तातडीने रद्द करण्यात यावा अन्यथा माढा तालुक्यातील तमाम शेतकर्यांच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा सोलापूर जिल्हा परिषदेचे समाजकल्याणचे माजी सभापती शिवाजीराजे कांबळे यांनी मुख्यमंत्री साहेबांना निवेदनाद्वारे दिला आहे, उजनी जलाशयावरती सिना माढा उपसा सिंचन योजना, भीमा सीना जोड कालवा, दहिगाव जलसिंचन योजना, बार्शी जलसिंचन योजना, शिरापूर जलसिंचन योजना, आष्टी जलसिंचन योजना, सांगोला जलसिंचन योजना, भीमा नदी, कॅनाॅल, सोलापूर शहरासाठी लागणारे पाणी,
एनटीपीसी प्रोजेक्ट साठी लागणारे पाणी या सर्व योजना शासनाने 1995 सली 120 टीएमसी पाणी वाटपाचे नियोजन पूर्णपणे करण्यात आलेले आहे वास्तविक पाहता वरीलपैकी 80 टक्के योजना ह्या आजही पूर्ण आहेत त्यापैकी सीना माढा जलसिंचन योजना बार्शी जलसिंचन योजना सांगोला जलसिंचन योजना दहिगाव जलसिंचन योजना शिरापुर जलसिंचन योजना या योजना अर्धवट असून अद्यापही पूर्णपणे सुरू झालेल्या नाहीत व काही योजनांची कामे ही अपूर्ण आहेत गेल्या 26 वर्षाच्या कालखंडापासून सोलापूर जिल्ह्यातील सर्व शेतकरी उजनीचे पाणी हे आपल्या शेतीला मिळेल ही अपेक्षा बाळगून आहेत व आमचा कायमचा दुष्काळी भाग असल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील 80 टक्के लोकांचा व्यवसाया शेतीवर अवलंबून आहे तरीही गेल्या 26 वर्षाच्या कालखंडामध्ये शासनाने निधी न दिल्यामुळे ह्या योजना अपूर्ण आहेत तरी आपण इंदापूर तालुक्यासाठी पाच टीएमसी पाणी देण्याचा जो निर्णय घेतला आहे तो सोलापूर जिल्ह्यासाठी अन्यायकारक असून यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतीचे शेतकऱ्यांचे व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे त्यामुळे आपण घेतलेला तो निर्णय तातडीने रद्द करण्यात यावा अन्यथा माढा तालुक्यातील शेतकऱ्यांसोबत तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशारा शिवाजीराजे कांबळे यांनी मुख्यमंत्री साहेबांना निवेदनाद्वारे दिला आहे.
No comments:
Post a Comment