Breaking

Wednesday, 26 May 2021

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - कोरोनामुळे आई-वडिलांचे छत्र हरवलेल्या पाल्यांना जिजाऊ गुरुकुल देणार मोफत शिक्षण.

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - कोरोनामुळे आई-वडिलांचे छत्र हरवलेल्या पाल्यांना जिजाऊ गुरुकुल देणार मोफत शिक्षण- या बाबत सविस्तर वृत्त असे महाराष्ट्र राज्यातील कोरोनामुळे आई-वडिलांचे छत्र हरवलेल्या पाल्यांना खांडवी तालुका बार्शी येथील जिजाऊ गुरुकुल च्या वतीने मोफत निवासी शिक्षण देणार असल्याची माहिती जिजाऊ गुरुकुल संस्थापक-अध्यक्ष संभाजी घाडगे यांनी दिली आहे.
VBP NEWS सोबत बोलताना घाडगे म्हणाले की सध्या संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट असून एक सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही जिजाऊ गुरुकुल च्या वतीने कोरोनामुळे आई-वडिलांचे छत्र हरवलेल्या तसेच अनाथ व पोरके झालेल्या पाल्यांना इयत्ता आठवी ते इयत्ता बारावी कॉमर्स तसेच सायन्स पर्यंतचे मोफत शिक्षण देणार असून यात विद्यार्थ्यांना हॉस्टेल्स मेस शाळा व कॉलेज पूर्णपणे मोफत राहणार आहे त्यासोबतच कोरोनामुळे आई वडिलांचे छत्र हरवलेले जी मुलं पोलीस व आर्मी भरतीची तयारी करीत असतील अशा मुलांचा भरती होईपर्यंतचा संपूर्ण खर्चही वीर भगतसिंग करियर अकादमीच्या वतीने करण्यात येणार असल्याचे सांगत संभाजी घाडगे यांनी महाराष्ट्रातील अशा पाल्यांच्या मोफत शिक्षणासाठी 9881962068, 8830949306 या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

 कोरोनामुळे आई-वडिलांचे छत्र हरवलेल्या पाल्यांना जिजाऊ गुरुकुल देणार मोफत शिक्षण- या बाबत सविस्तर वृत्त असे महाराष्ट्र राज्यातील कोरोनामुळे आई-वडिलांचे छत्र हरवलेल्या पाल्यांना खांडवी तालुका बार्शी येथील जिजाऊ गुरुकुल च्या वतीने मोफत निवासी शिक्षण देणार असल्याची माहिती जिजाऊ गुरुकुल संस्थापक-अध्यक्ष संभाजी घाडगे यांनी दिली आहे.
VBP NEWS सोबत बोलताना घाडगे म्हणाले की सध्या संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट असून एक सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही जिजाऊ गुरुकुल च्या वतीने कोरोनामुळे आई-वडिलांचे छत्र हरवलेल्या तसेच अनाथ व पोरके झालेल्या पाल्यांना इयत्ता आठवी ते इयत्ता बारावी कॉमर्स तसेच सायन्स पर्यंतचे मोफत शिक्षण देणार असून यात विद्यार्थ्यांना हॉस्टेल्स मेस शाळा व कॉलेज पूर्णपणे मोफत राहणार आहे त्यासोबतच कोरोनामुळे आई वडिलांचे छत्र हरवलेले जी मुलं पोलीस व आर्मी भरतीची तयारी करीत असतील अशा मुलांचा भरती होईपर्यंतचा संपूर्ण खर्चही वीर भगतसिंग करियर अकादमीच्या वतीने करण्यात येणार असल्याचे सांगत संभाजी घाडगे यांनी महाराष्ट्रातील अशा पाल्यांच्या मोफत शिक्षणासाठी 9881962068, 8830949306 या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

No comments:

Post a Comment