वेळ दुपारी बाराची.... टाकाळा रोड वरती मुनिफ यांच्या झेरॉक्स सेंटर मध्ये कामानिमित्त थांबलो होतो उन्हाच्या लाह्या होत होत्या आणि दोन्ही पायांनी अपंग असलेली रेश्मा तांबोळी ही महिला आपल्या दोन मुलांसह टेंबलाई नाका ते बाबुजमाल येथे भीक मागून पोट भरण्याकरिता भर उन्हात जात होती कामानिमित्त त्या ठिकाणी आलेले दीप पटेल (पटेल ऑइल मिल) यांनी सदर महिलेची चौकशी केली. लहानपणापासून ती अपंग आहे व दोन्ही पायांना चिंध्या बांधून भर उनात रस्त्यावरून पाय घासत भिक मागून संसाराचा गाडा चालवते व दोन मुलांची पोट भरते हे ऐकून दिप पटेल यांनी क्षणाचाही न विचार करता त्यांना साडेपाच हजार रुपये ची सायकल अवघ्या दहा मिनिटात आणून देऊन दातृत्व काय असतं याची जाणीव समाजाला करून दिली...... खरच आज मी माणसातला देव पाहिला......!
Sunday, 2 May 2021
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी/ रेणूताई पोवार - आज मी माणसातला देव पाहिला.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment