मोहोळ शहर प्रतिनिधी/ सुनिल गायकवाड - दि. 23/5/2021 ची सोलापूर जिल्ह्यातील महापालिका क्षेत्र वगळून ग्रामीण व नगरपालिका क्षेत्रातील कोविड-19 ची माहिती-
याबाबत वृत्त असे की सोलापूर जिल्ह्यात सध्या ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे, सोलापूर शहरातील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाला यश आले आहे, परंतु ग्रामीण भागातील कोरोनाने थैमान घातले असून रूग्ण संख्या वाढत आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग ग्रामीण भागातील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहे.
का वाढला ग्रामीण भागात कोरोना?
तर उत्तर आहे नागरिक शासनाच्या नियमांचे पालन करत नाहीत, सोशल डिस्टंस ठेवत नाहीत, मास्क व सॅनिटायझर वापर करत नाहीत,
भाजीमंडई असेल किराणा दुकान असेल तेथे ग्राहकांची सामान व भाजीपाला खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी झालेली दिसून येते. प्रशासनाने वारंवार सूचना देऊन सुद्धा लोक नियमांचे पालन करत नाहीत.
म्हणूनच सोलापूर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जिल्हाभर कडक निर्बंध लागू केले आहेत, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने पूर्ण पणे बंद
ठेवण्यात आली आहेत. निर्बंध कडक करण्यात आले आहेत. ग्रामीण भागातील पोलिस प्रशासनही सज्ज झाले असून विनाकारण फिरणार्यांवर कडक कारवाई केली जात आहे. त्यातच सोलापूर जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा मोठ्या धैय्याने कोरोनाला हरवण्यासाठी धडपडत आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य यंत्रणेकडून जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राना भरपूर प्रमाणात रसद पुरविली जात आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणा नागरिकांना वारंवार सूचना करत आहे, मास्क व सॅनिटायझर वापर करा, सोशल डिस्टंस ठेवून वागा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा,
माझं कुटूंब माझी जबाबदारी, तसेच सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने नागरिकांना लस घेण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे. आता गरज आहे ती नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याची, शासनाच्या नियमांचे पालन करण्याची तरच सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कोरोना आटोक्यात येईल.
दि.23/5/2021 ची सोलापूर जिल्ह्यातील महापालिका क्षेत्र वगळून ग्रामीण व नगरपालिका क्षेत्रातील कोविड-19 ची माहिती सोलापूर जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ शितलकुमार जाधव यांनी सादर केली आहे यामध्ये घरात अलगीकरण, संस्थात्मक अलगीकरण, आयसोलेशन रूग्णांची माहिती,
आज प्राप्त झालेले अहवाल, सोलापूर जिल्ह्यातील पाॅझीटीह्व रूग्णांची माहिती, सोलापूर जिल्ह्यातील मयत रूग्णांची माहिती, सोलापूर जिल्ह्यातील कोविड-19 तालुका निहाय माहिती, सोलापूर जिल्ह्यातील कोविड-19 तालुका निहाय गोषवारा अशी एकूण आजच्या दिवसभरातील माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ शितलकुमार जाधव यांनी तालुका वाईज दिली आहे ती पुढील प्रमाणे.......


No comments:
Post a Comment