मोडनिंब येथील श्री वेताळ देवस्थान यात्रा यावर्षी कोरोना च्या महामारी मुळे रद्द करण्यात आली असून यात्रा 24 मे ते 26 मे 2021 या काळात दैनंदिन नित्य पूजा हे दोन पुजारी( गुरव) यांच्या हस्ते पार पडणार असल्याची माहिती,
माजी सरपंच तथा श्री वेताळ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष कुरण अण्णा गिड्डे यांनी दिली श्री वेताळ देवस्थान यात्रा गतवर्षी ही कोरणा मुळे रद्द करण्यात आली होती दिनांक 24 मे ते 26 मे 2021 रोजी होणारी वेताळ देवाची यात्रा कोरोनाच्या महामारी मुळे रद्द करण्यात आली असून,
यात्राकाळात कोणतेही कार्यक्रम होणार नाहीत सदर काळात कोणीही यात्राकाळात देवस्थान कडे गर्दी करू नये यात्रा होणार नसून निवद नारळ आपल्या घरीच देवाला दाखवून सहकार्य करावे असे आव्हान देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष कुरण अण्णा गिड्डे यांनी केले आहे.
सदरचे निवेदन पोलीस निरीक्षक टेंभुर्णी पोलीस दूरक्षेत्र मोडनिंब यांनी दिली आहे याप्रसंगी श्री वेताळ देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष संभाजी लादे सचिव विजय खेलबुडे उद्योगपती सोमनाथ शेठ शिंदे अनिल पाटील अभी चव्हाण आयुष शिंदे उपस्थित होते.
यात्राकाळात परगावाहून कोणीही येऊ नये काळजी घ्यावी देवस्थान जवळ गर्दी करू नये केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आव्हान दूर क्षेत्राचे शिवाजी भोसले साहेब यांनी केले आहे


No comments:
Post a Comment