*आंदोलनकर्त्यांना लेखी पत्र द्या अन्यथा महिला हातात लाटणे घेऊन पालकमंत्र्यांना जाब विचारतील साधना देशमुख*
गेल्या १३ दिवसांपासून उजनी धरणावर गेटवर सुरु असलेल्या आंदोलनात आज प्रभाकर देशमुख यांचे कुटुंब कोरोनाच्या भयानक काळात सुध्दा साधना देशमुख,मुलगी सृष्टी देशमुख,मुलगा शंभुराजे देशमुख या आंदोलनात सहभागी होऊन आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला.यावेळी बोलताना मोहोळ पंचायत समितीच्या मा.उपसभापती साधना देशमुख म्हणाल्या की सोलापूर जिल्ह्याचे हक्काचे
अजित पवार यांनी हे पाप करू नये
पाणी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी इंदापूरला बेकायदेशीररित्या पळविण्याचा प्रयत्न केला असुन पवार घराण्याचे राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचे प्रपंच उध्वस्त करून पवार घराण्याने हे पाप करु नये या प्रवृत्तीला विरोध म्हणून सोलापूर जिल्ह्यातील महिला सुध्दा हातात लाटणे घेऊन पालकमंत्री यांना जाब विचारतील.
सोलापूर जिल्ह्यातील गावोगावचे शेतकरी पेटून उठले असुन आज टाकळी(टें), वडोली,उजनी (मा),पांढरेवाडी, कविटगांव यासह आजपर्यंत ५३ ग्रामपंचायतीनी ठराव समक्ष दिले हे त्याचे उदाहरण आहे.
कोणाची उपस्थित होती
*जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैय्या देशमुख,संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन बापु जगताप,प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ताभाऊ व्यवहारे,रयत क्रांती संघटना सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख प्रा.सुहास पाटील सर,विठ्ठल आबा मस्के,सचिन पराडे पाटील,रामदास खराडे, मल्हारी गवळी,प्रंशात महाडिक,धवल पाटील,मंगेश वाघ,दादासो गायकवाड, अतुल भालेराव,अंकुश महाडिक, नारायण गायकवाड,तानाजी गायकवाड, सचिन गायकवाड,गणेश उजगीरे,सिध्दार्थ भास्कर,दत्ता आरकिले, विजयराजे खराडे,संजय नवले,श्रीराम महाडिक, टाकळी पार्टीप्रमुख तानाजी सलगर,सरपंच हरि माने, वडोलीचे सरपंच भैय्या गाडे,भारत माने सर,औदुंबर घाडगे,उजनी (मा) सरपंच अविनाश निकम,शिवाजी जाधव,सदस्य बाळासाहेब जाधव,रमेश जाधव,कुलदीप पाटील,अक्षय शिंदे,विष्णु तात्या बिचकुले,यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते*.
शासनाने तो नियम पाळला नाही
स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी उजनी धरणाची निर्मीती करताना सोलापूर जिल्ह्यासाठी बारमाही पाणी देण्याची तरतूद केली होती तो पण नियम पाळला नाही आता 5TMC पाणी पळवुन सोलापूर जिल्ह्या ओसाड करायचा ठरविला आहे काय - सामाजिक कार्यकर्त्या स्वाती ताई पाटील


No comments:
Post a Comment