कृष्णा भीमा स्थिरीकरणाच्या धरतीवर बारामतीचे स्थिरीकरण करण्याचा पवारांचा घाट....खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर- याबाबत वृत्त असे की ---कृष्णा भीमा स्थिरीकरणाच्या धरतीवर बारामतीचं स्थिरीकरण करण्याचा घाट पवारांनी घातला आहे. परंतु सोलापूर जिल्ह्यातील जनता यांना माफ करणार नाही. सत्ता परिवर्तन झाल्यास सोलापूर जिल्ह्याच्या हक्काच पाणी जिल्ह्यालाच मिळेल याबाबतीत जनता संघर्ष उभा करून कोर्टात धाव घेणार ...लोकप्रतिनिधींच्या हृदयात जर पवार असतील तर इंदापूर साठी नेलेल पाणी माघारी आणावं ....सत्ता स्थापणेसाठी राज्यातील जनतेचा उपयोग करायचा आणि फायदा मात्र बारामतीकराणी करून घ्यायचा असा थेट निशाना खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी बोलताना साधला कोविड पेंशटची विचारपूस करून जिल्हाधिकार्यांशी संवाद साधला
यावेळी जिल्हा अध्यक्ष श्रीकांत दादा देशमुख सवेरी कॉलेज चे प्राचार्य रोंगे सर .माढा तालुका भाजप सरचिटणीस योगेशजी पाटील ,करमाळा भाजप अध्यक्ष गणेश चिवटे, विजयसिंह परबत ,प्रांत ,बीडीओ ,ता आरोग्य अधिकारी डॉ थोरात ,सुधीर गाडेकर ,तालुका चिटणीस प्रकाश चोपडे ,भाजप शाखाध्यक्ष संभाजी चव्हाण ,माढा तालुका प्रसिद्धी प्रमुख दिनेश शिंदे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment